गोंदिया : आमगाव खुर्द, सालेकसा येथील भाटिया ट्रेडर्सचे शटर तोडून ८ लाख ९ हजार ६११ रुपये किमतीचे ५६ मोबाईल पळवून नेणाऱ्या आरोपींकडून ८० मोबाईल जप्त करण्यात करण्यात आले. या प्रकरणात एकूण ८ लाख २५ हजार ६११ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी विष्णू खोकन विश्वास ( ३१) रा. अरुणनगर, कोरंबीटोला, पिंकू नरेन्द्र मिस्त्री (४०) रा. अरुणनगर कोरंभीटोला, सूरज चित्तरंजन विश्वास (३०) रा. बंगाली कॅम्प शास्त्रीनगर चंद्रपूर ह.मु. शिवाजी चौक, केशोरी यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. गुन्ह्याची कसून चौकशी केली असता आरोपी पिंकू नरेन्द्र मिस्त्री (४०) रा. अरुणनगर यांने विष्णू खोकन विश्वास रा. अरुणनगर आणि सूरज चित्तरंजन विश्वास रा. केशोरी यांच्या स्कॉर्पिओ वाहनाने आमगाव खुर्द सालेकसा येथील मोबाईल दुकान गाठले. तेथील मोबाईल व पैसे चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेले मोबाईल क्रिष्णा निखिल मंडल रा. दिनकरनगर याच्या गणराज मोबाईल रिपेअरिंग सेंटर केशोरी येथील दुकानात विक्रीसाठी ठेवले होते. मोबाईल जसजसे विक्री होतील तसतसे पैसे क्रिष्णा निखिल मंडल आरोपींना देणार होता. या गुन्ह्यातील ५० मोबाईल व अतिरिक्त ३० नग मोबाईल असा एकूण किंमत १० लाख २४ हजार ५५५ रुपयाचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन सालेकसा येथील दोन वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पथक तयार केले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक महेश बन्सोडे, वैशाली पाटील, सालेकसाचे प्रभारी अधिकारी प्रमोद बघेले, पोलीस उपनिरीक्षक सोरते, पोलीस हवालदार शहारे यांनी केली आहे.