आॅनलाईन लोकमतकाचेवानी : गोंदिया आणि तिरोडा तालुक्याच्या सीमेलगत बरबसपुरा-एकोडी परिसरात सोमवारी (दि.११) सकाळच्या सुमारास पट्टेदार वाघ आढळल्याने शेतकºयांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाने सुध्दा याला दुजोरा दिला दिला.बरबसपुरा-एकोडी या गावाच्या दरम्यान अशोक लिचडे यांच्या शेतात सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वाघाच्या पायाचे चिन्हे आढळली. दरम्यान याच पट्टेदार वाघाने माजी सरपंच ममता लिचडे यांचा मुलगा अश्वीन यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे लिचडे यांनी सांगितले. त्यानंतर याची माहिती वन परिक्षेत्राधिकारी कदम यांना देण्यात दिली.कदम यांनी सांगीतले की सकाळी ६.३० वाजता सुमारास एक पट्टेदार वाघ पालडोंगरी परिसरात आढळला.त्यानंतर अदानी टाऊन-शिपमार्गे मजीतपूरकडे गेल्याचे सांगितले. यानंतर लिचडे यांनी दुपारी १२.३० वाजता वनपरिक्षेत्राधिकारी कदम यांना फोन करुन तो वाघ जंगलाकडे गेला नसून शेतशिवारातच असल्याची माहिती दिली. यामुळे या भागातील अनेक शेतकºयांनी शेतावर जाणे टाळल्याची माहिती आहे.
बरबसपुरा परिसरात पट्टेदार वाघाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 10:45 PM