गोंदिया : एक्यूट पब्लिक शाळेमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, जिल्हा वकील संघाच्या संयुक्तवतीने गुरूवारी मानवाधिकार दिनानिमित्त कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधिश मु.ग. गिरटकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, गिता भास्कर, मुख्याध्यापीका निविशा भास्कर तर मार्गदर्शक म्हणून माजी जिल्हा सरकारी वकील अॅड. बिना बाजपेई, संज्योत बहू. शिक्षण संस्थेचे सचिव संजय भास्कर, सहसचिव शुभा शहारे, जिल्हा वकील संघाच्या सहसचिव मंगला बन्सोड, शाळेचे मुख्याध्यापक पी.एच. पांडे उपस्थित होते.याप्रसंगी न्यायाधीश गिरटकर यांनी, मानवाधिकार संरक्षण अधिनियम १९९३ व २००८ यांच्याविषयी विस्तृत माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी, नागरिकांचे भूलभूत कर्तव्ये यांच्याविषयी माहिती सांगितली. पोलीस निरीक्षक पवार यांनी, पोलीस -नागरिक समन्वय यांच्याबद्दल नागरिकांना जागरुक राहण्यास सांगितले. अॅड. बाजपेयी यांनी, बाल न्याय कायदा २००० व २००६ यांच्याविषयी अधिक माहिती प्रदान केली. तर संदय भास्कर यांनी, विद्यार्थ्यांचे अधिकार याबद्दल माहिती दिली. संचालन नरेंद्र मेश्राम यांनी केले. आभार प्रशांत गोडबोले यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
कायदेविषयक साक्षरता शिबिर
By admin | Published: December 12, 2015 4:26 AM