दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : महावितरणच्या गोरेगाव उपविभागांतर्गत वीज ग्राहकांची संख्या २२ हजार आहे. मात्र हायटेक तंत्रज्ञानाच्या युगातही तालुक्यातील १३ हजार ग्राहकांनी आॅनलाईन वीज बिल भरण्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. महावितरणने पोस्ट आॅफीस, बँक, आॅनलाईन व स्वत:ची आऊटलेट संस्था बिल भरण्यासाठी खुली केली असली तर पोस्ट आॅफीसमध्ये बिल भरताना होणाऱ्या अडचणीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.महावितरणकडे उपलब्ध आकडेवारीनुसार तालुक्यात २२ हजार वीज ग्राहकांपैकी फक्त ९ हजार ग्राहकांनी आॅनलाईन वीज बिल भरले आहे. ग्राहकांचा आॅनलाईन वीज बिल भरणा प्रणालीला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा महावितरणकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र ४५ टक्के ग्राहकांनीच आॅनलाईन वीज बिल भरण्यासाठी प्राधान्य दिले आहे. वीज ग्राहकांना संगणक व मोबाईल अॅपच्या माध्यमातून वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यातून ग्राहकांचा वेळ व श्रमाची बचत होते. तासनतास रांगेत थांबण्याची गरज भासू नये यासाठी महावितरणने संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे.शिवाय मोबाईल अॅप उपलब्ध करुन दिले आहे. या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या तरी ग्रामीण भागातील ग्राहकांकडून आॅनलाईन प्रणालीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील महावितरणच्या ग्राहकापैकी १३ हजार ग्राहक पोस्ट आॅफीस व महावितरणच्या आऊटलेटमध्ये वीज बिल भरतात. मात्र ग्राहकांना ग्रामीण भागात वीज बिल भरतांना मोठी अडचण येते. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना उशीरा बिल जमा केल्याच्या नावावर अधिकचा भुर्दंड सहन करावा लागतो. एकीकडे वीेज वितरण महामंडळाचे उशीरा वीज बिल वाटप तर दुसरीकडे वीज बिल भरण्याची अडचण यामुळे वीज कपात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.एसएमएससाठी मोबाईल क्रमांक नोंदणीमहावितरणच्यावतीने वीज ग्राहकांसाठी एसएमएस सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय ग्राहकांना विविध सेवांची माहिती मिळावी व तक्रारीचे निवारण करण्यासाठी टोल फ्री क्रमांकही दिला आहे.भाषेचा पर्याय उपलब्धमहावितरणच्यावतीने ग्राहकांना आपले वीज बिल भरण्यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेतील अप्लिकेशन देण्यात आले आहे. ही सेवा २४ तास उपलब्ध आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना आपले वीज बिल भरण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही असा महावितरणचा दावा आहे.पोस्ट आॅफीसमध्ये वीज बिल भरतांना ग्राहकांना मोठी अडचण होते. त्यामुळे अनेकवेळा ग्राहकांच्या वीज बिलावर दुसºया महिन्याचे वीज बिल जोडून येते. त्यामुळे ग्राहकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागतो. या प्रकारावर उपाय म्हणून महावितरणची आऊटलेट उघडून ग्राहकांना चांगली सेवा देता येईल.- ए.डी.भांडारकर, उपविभागीय अभियंता, महावितरण, गोरेगाव.
१३ हजार वीज ग्राहकांची आॅनलाईनकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:11 PM
महावितरणच्या गोरेगाव उपविभागांतर्गत वीज ग्राहकांची संख्या २२ हजार आहे. मात्र हायटेक तंत्रज्ञानाच्या युगातही तालुक्यातील १३ हजार ग्राहकांनी आॅनलाईन वीज बिल भरण्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. महावितरणने पोस्ट आॅफीस, बँक, आॅनलाईन व स्वत:ची आऊटलेट संस्था बिल भरण्यासाठी खुली केली असली तर पोस्ट आॅफीसमध्ये बिल भरताना होणाऱ्या अडचणीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ठळक मुद्देमाहितीचा अभाव : तालुक्यात महावितरणचे २२ हजार वीज ग्राहक