लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात तसेच अनेक कार्यक्रमातून स्वच्छतेचा संदेश दिला आहे. याच धर्तीवर सर्वत्र स्वच्छ भारत उपक्रम राबविला जात आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्याची समस्याची निर्माण होते.त्यामुळे सर्वांनी आपला परिसर गाव स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.याच संदेशाचे पालन करीत तालुक्यातील जामखारी येथील बालकांनी चक्क हातात फावडे घेऊन नाल्यांमधील केरकचरा व गाळ काढून गावकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.‘गाव हा शरीर, त्यास राखावे पवित्र, त्यानेच नांदेल सर्वत्र आनंद, राममधून पूर्वी गावपूर्ण व्हावे स्वच्छ’, सौदर्यवान कोणाही घरी गलिच्छपणा ना दिसावे, या कवितेला सार्थक ठरवित जामखारी या गावातील मुलांनी स्वच्छेतून समृद्धीची वाटचाल कशी करावी याचा आदर्श गावकरी आणि जिल्हावासीयांसमोर ठेवला आहे.जामखारी या गावातील काही ठिकाणी लोक वस्तीतील गटार नाल्या गाळाने तुडूंब भरलेली आहे. या नाल्यांमधून सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्याला मार्ग अवरुध्द झाले असल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.ही समस्या मार्गी लावण्यासाठी चक्क मुलांनी स्वच्छतेचे ध्येय स्विकारुन हातात फावडे, कुदळ घेऊन गाव स्वच्छतेला सुरूवात केली.यात तुषार शरणागत, गौरव कटरे, कार्तिक कटरे, मयुर शरणागत, पंकज बिसेन, भुपेंद्र शरणागत, लोकेश बघेल, चिंटू बिसेन, टुलेंद्र पटले, रुपेश बघेले, नैपाल श्रणागत, नरेंद्र कटरे, खुशी ठाकरे, धारना शरणागत, दिव्या शरणागत गावातील रस्ते नाल्यांमधील गाळाचा उपसा केला.गाव पातळीवर लहान बालकांनी स्वच्छतेविषयी जागृती निर्माण केली.नागरिकांनी या स्वच्छते मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. गावातील प्रत्येक प्रभागात हा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला.
बालकांनी दिले स्वच्छतेतून समृद्धीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:52 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात तसेच अनेक कार्यक्रमातून स्वच्छतेचा संदेश दिला आहे. याच धर्तीवर सर्वत्र स्वच्छ भारत उपक्रम राबविला जात आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्याची समस्याची निर्माण होते.त्यामुळे सर्वांनी आपला परिसर गाव स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.
ठळक मुद्देसंडे अँकर । हातात फावडा घेऊन केली स्वच्छता, प्रत्येक प्रभागात स्वच्छतेचा संकल्प