आॅनलाईन लोकमतगोंदिया : २०१७ संपला असून २०१८ या नववर्षातील पहिला दिवस उजाडला आहे. मागील वर्षात झाले ते झाले, मात्र हे वर्ष सुख व समाधानाचे जावे याकरिता देवाला साकडे घालण्यासाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि.१) नागरिकांची धार्मिक स्थळांवर गर्दी दिसून आली.मागील वर्षात काही चांगले तर काही वाईट अनुभव आले. मुख्य म्हणजे देशातील आतंकवादी हल्ले, गुन्हेगारी, खून, अत्याचार यासारख्या घटनांनी मागचे वर्ष गाजले व कलंकितही झाले. सोबतच दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे जनता चांगलीच त्रस्त झाले. दुसरीकडे अपघात व गुन्हेगारी घटनांनीही जिल्हा गाजला. एकंदरीत मागील वर्षात रोज काही ना काही ऐकायला आले. मात्र २०१८ या नववर्षात असे काही अभद्र ऐकायला येऊ नये. मागील वर्षी झाले ते झाले, चुकांना पदरात पाडून व हे वर्ष कुशल, मंगल झाले पाहीजे अशी कामन सर्वांनी विविध मंदिरामध्ये पोहचून केली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (दि.१) नागरिकांनी मंदिर, मस्जीद, गुरूद्वारे व चर्चमध्ये जाऊन आपापल्या प्रार्थना पद्धतीनुसार देवाला साकडे घातले.हनुमान मंदिरात गर्दीशहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान मंदिराची शहरासह लगतच्या परिसरातही ख्याती आहे. जागृत मंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते. नेहमीच या मंदिरात गर्दी असते व दूरवरून लोकं येथे हनुमंताच्या दर्शनासाठी येतात. नववर्षाचा पहिला दिवस असल्याने नवे वर्ष सुख व समाधानाचे जावे हे साकडे हनुमंताला घालण्यासाठी सोमवारी नागरिकांनी एकच गर्दी केली. सकाळच्या आरतीपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी दिसून येत होती.न्यु इयर सेलीब्रेशन धार्मिक स्थळांवर२०१७ ला बाय-बाय करण्यासाठी थर्टीफस्ट सेलीब्रेशन पार्टी करून साजरा करण्यात आला. मात्र नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांचा कल धार्मिक स्थळांकडे दिसला. नवीन वर्षात सुख,समृद्धी व समाधान लाभावे यासाठी देवाला साकडे घालून भाविक त्यांचा आर्शिवाद घेत असल्याचे चित्र पाहयला मिळाले. सकाळपासून अगोदर घरातील थोरामोठ्यांचे चरणस्पर्श करून व त्यानंतर आपापल्या धर्मस्थळांवर जाऊन नागरिकांनी आपल्या इष्ट देवाचा आर्शिवाद घेण्यास पसंती दर्शविली. यामुळेच हॉटेल्समध्ये गर्दी असतानाच धार्मिक स्थळांवरही नागरिकांची गर्दी बघावयास मिळाली.
काम होऊ दे, नववर्ष सुखाचे जाऊ दे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:01 AM
२०१७ संपला असून २०१८ या नववर्षातील पहिला दिवस उजाडला आहे. मागील वर्षात झाले ते झाले, ...
ठळक मुद्देदेवाला साकडे : सर्व धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी