लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आ.गोपालदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल यांच्यातर्फे रेलटोली येथे शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राष्ट्रीय स्तरावरील ३७ कंपन्यांनी सहभाग घेवून युवकांच्या मुलाखती घेवून तब्बल ६०० युवकांना नियुक्ती पत्र देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली. या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील पाच हजारांवर सुशिक्षित बेरोजगारांनी हजेरी लावली होती.जिल्ह्यात रोजगाराचा अभाव असल्याने सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.जिल्ह्यातील युवकांना रोजगार भिमुख शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांच्या पुढाकाराने तंत्रनिकेतन महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. अनेक युवकांमध्ये कौशल्य व शैक्षणिक पात्रता असताना सुध्दा त्यांना रोजगार मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या हाताला रोजगार कसा उपलब्ध होईल या दृष्टीने प्रताप मेमोरियल ट्रस्टतर्फे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात राष्ट्रीय स्तरावरील ३७ कंपन्यानी सहभागी होवून युवकांच्या मुलाखती घेवून ६०० युवकांची विविध कंपन्यामध्ये निवड केली. तसेच निवडीचे पत्र सुध्दा युवकांना मेळाव्याच्या ठिकाणी देण्यात आले.विशेष म्हणजे या मेळाव्यात जिल्ह्यातील पाच हजारावर युवक सहभागी झाले होते. अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळाल्याने या रोजगार मेळाव्यासाठी आल्याचा लाभ झाल्याचे सांगितले.युवकांनो खचून जाऊन नका, संधी येतीलप्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट व प्रफुल अग्रवाल यांच्या पुढाकाराने आयोजित रोजगार मेळाव्यामुळे युवकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.अनेक युवकांना रोजगाराची संधी मिळाली. मात्र ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी खचून जाऊ नये, या मेळाव्यात अनेक राष्ट्रीय स्तरावरील आणि नामाकिंत कंपन्यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यामुळे युवकांचा अनुभव दुप्पट वाढला आहे. त्यामुळे आपली निवड झाली नाही म्हणून खचून न जाता आयुष्यात पुन्हा संधी येतील त्या दृष्टीने तयार करण्याचे आवाहन आ.गोपालदास अग्रवाल यांनी रोजगार मेळाव्यात युवकांना मार्गदर्शन करताना केले.जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी कशा प्राप्त होईल यादृष्टीने आपले प्रयत्न सुरू असून बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याचे आ.अग्रवाल यांनी सांगितले.तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाईल,अशी ग्वाही युवकांना दिली.या मान्यवरांची उपस्थितीरोजगार मेळाव्याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, जि.प.सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष उषा शहारे, शहरध्यक्ष अशोक चौधरी, नगरसेवक सुनील भालेराव,क्रांती जायस्वाल, पराग अग्रवाल, राकेश ठाकूर, व्यंकट पाथरु,देवा रूसे, डॉ.टी.पी.येडे, राजेश चौरसीया, विमल नागपूरे, निता पटले, संदीप रहांगडाले, विजय रहांगडाले, रोहन रंगारी, चेरीस खांडेकर उपस्थित होते.
रोजगार मेळाव्यात ६०० युवकांना नियुक्ती पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:05 PM
आ.गोपालदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल यांच्यातर्फे रेलटोली येथे शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : विविध कंपन्यांचा सहभाग, पाच हजार युवकांचा सहभाग