शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

निलंबनाच्या धास्तीने बिट काढण्याचे पोलिसांचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 12:21 AM

शहरातील अवैध व्यावसायीकांना अभय देण्याचा ठपका ठेवत गोंदिया शहर व रामनगर पोलीस ठाण्यातील आठ पोलीस कर्मचाऱ्यांना गुरूवारी निलंबित करण्यात आले. या निलंबनाचा धसका घेत आमच्यावरही निलंबनाची पाळी येऊ नये,......

ठळक मुद्देएलसीबीच्या कारवाईवरून निलंबन : सोपविला सर्कलचा कार्यभार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील अवैध व्यावसायीकांना अभय देण्याचा ठपका ठेवत गोंदिया शहर व रामनगर पोलीस ठाण्यातील आठ पोलीस कर्मचाऱ्यांना गुरूवारी निलंबित करण्यात आले. या निलंबनाचा धसका घेत आमच्यावरही निलंबनाची पाळी येऊ नये, म्हणून गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी बिटाचे काम आम्हाला नको म्हणून ठाणेदाराला अर्ज केल्याची माहिती आहे.गोंदिया शहर वरामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डे, दारू, सट्टापट्टी व इतर अवैध धंदे सुरू होते. तेथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जाऊन कारवाई केली. त्यामुळे ज्यांच्या बिटात हे धंदे सुरू होते त्या पोलिसांवर पोलिस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली आहे.यात रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत बीट क्र. २ येथील पोलीस हवालदार कृष्णराम खेमराज ठाकरे बक्कल क्र.२९८, प्रितमकुमार खामले बक्कल क्र.७५१, अनिल पारधी बक्कल क्र. ६७१, हिरादास पिल्लारे बक्कल क्र. ५३०, गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील बीट क्र.१ छोटा गोंदियाचे बीट जमादार पोलीस हवालदार सुरेश मेश्राम बक्कल क्र. ७१२, बीट क्र. २ सराफा लाईनचे बीट जमादार सहाय्यक फौजदार मारोती गोमासे बक्कल क्र. ४२५, राजानंद वासनिक बक्कल क्र. ७५५ व बीट क्र.३ गणेशनगर सांभाळणारे पोलीस हवालदार इंदल आडे बक्कल क्र. ४८५ यांचा समावेश आहे. पोलीस अधिक्षकांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलीस चांगलेच धास्तावलेल आहे. स्थानिक गुन्हे शाखा जिथे-जिथे कारवाई करेल तिथल्या पोलिसांना निलंबनाचा फटका बसेल का ही धास्ती त्यांच्या मनात आहे.या भितीपोटी गोंदिया शहरातील ज्या बीटातील हवालदारांना निलंबित केले. त्या बिटातील इतर कर्मचाऱ्यांना आम्हाला सामन्य ड्युटी द्या बीट देऊ नका, अन्यथा मुख्यालयात जमा करा अशी विनंती अर्ज ठाणेदाराला लिहिला आहे. गोंदिया शहर व रामनगर या पोलीस ठाण्यातील पाच सर्कलमध्ये काम करणारे २६ लोक असताना फक्त ८ जणांवरच निलंबन झाल्याने निलंबन होणारे कर्मचारी मानसिक तणावात आले आहेत. हवालदार मेश्राम, इंदल आडे व खांबले हे मुख्यालयाचे कर्मचारी होते. त्यांना मदत करण्यासाठी प्रतिनियुक्तीवर पोलीस ठाण्यात देण्यात आले.मुख्यालयातील व्यक्तीवर सर्कलचा कारभार देता येत नाही,असे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. परंतु निलंबित झालेल्या या कर्मचाºयांवर सर्कलचा प्रभार होता.मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे त्यांच्यावर सर्कलचे काम देण्यात आल्याचे समजते. रामनगरातील हवालदार कृष्णककुमार ठाकरे यांची बदली चिचगड येथे झाली होती. परंतु मनुष्यबळाचा अभाव दाखवून ठाणेदाराने त्यांना न सोडल्यामुळे त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले.

टॅग्स :Policeपोलिस