लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी- बियाणे, खते व कीटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने ९ भरारी पथक स्थापन केली आहेत. तसेच २६ गुणनियंत्रण निरीक्षकांचा समावेश असून, गुणनियंत्रण निरीक्षकामार्फत कृषी केंद्राची अचानक तपासणी केली असता त्यात अनियमितता आढळल्याने ९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरुपी रद्द, तर आठ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले.
कृषी केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नूतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे, विक्री करीत असलेल्या कृषी निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे, आदी कारणामुळे ८ कृषी केंद्रांचे परवाने दोन महिन्यांसाठी निलंबित केले. शेतकऱ्यांना त्यांच्यात गावात कृषी निविष्ठा उपलब्ध व्हावे म्हणून शैक्षणिक पात्रता असलेल्या अर्जदारांना परवाना देण्यात आले होते. परंतु, कृषी केंद्र संचालक यांनी परवान्यामध्ये नमूद घर क्रमांकावर कृषी केंद्र उघडलेले नव्हते.
हे कृषी केंद्र दोन महिन्यासाठी निलंबित एस.आर. कृषी केंद्र दांडेगाव, ता. गोंदिया बियाणे, खते व कीटक- नाशके परवाना दोन महिन्यांकरिता, शेतकन्या महिला शेतकरी उत्पादक कंपनी, दांडेगाव, ता. गोंदिया बियाणे, खते व कीटकनाशके परवाना २ महिन्यांकरिता, मो. गायत्री कृषी केंद्र मेंढा, ता. तिरोडा बियाणे, खते व कीटकनाशके परवाना २ महिन्यां- करिता, असे एकूण आठ परवाने निलंबित करण्यात आले आहे.
या कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरुपी रद्द आगाशे कृषी केंद्र महालगाव ता. गोंदिया, जय किसान कृषी केंद्र रतनारा, ता. गोंदिया, माँ शारदा कृषी केंद्र रतनारा, महालक्ष्मी कृषी केंद्र रतनारा, प्रगती कृषी सेवा केंद्र रतनारा, वैनगंगा कृषी केंद्र महालगाव, पराते कृषी केंद्र हलबीटोला, रवी ट्रेडर्स व कृषि केंद्र एकोडी, संकल्प कृषी केंद्र लोधीटोला, राधाकृष्ण कृषी केंद्र डोंगरगाव, दोनोडे कृषी केंद्र धापेवाडा, अग्रवाल कृषी केंद्र, हेमने कृषी केंद्र मोरवाही, के.एम.पी. कृषी केंद्र, खते व किटकनाशके, पारधी कृषी केंद्र टेमनी, गजभिये कृषी तिरोडा, मलेवार कृषी केंद्र केसलवाडा, रहांगडाले कृषी केंद्र बेलाटी बु, शेंडे कृषी केंद्र पिंडकेपार, रेणुका कृषी केंद्र बिरसी, एम. एम. खोब्रागडे कृषी केंद्र ठाणेगाव, त्रिशिका कृषी केंद्र परसवाडा, समिर कृषी केंद्र मुंडिपार, कुंज कृषी केंद्र बेरडीपार, नरेश कृषी केंद्र सेजगाव, याची कृषी केंद्र ठाणेगाव, भेलावे कृषी केंद्र वडेगाव, मोहारे कृषी केंद्र मुंडीकोटा, ओम साई कृषी केंद्र पिपरीया, न्यु लोहिया कृषी केंद्र नवेझरी बियाणे, पारधी कृषी केंद्र वडेगाव, अन्नपूर्णा कृषी केंद्र, कटरे कृषी केंद्र मुंडीकोटा, सोनवाने कृषी केंद्र वडेगाव, गौतम कृर्षी केंद्र जमुनिया, प्रतीक्षा कृषी केंद्र ठाणेगाव, डोंगरे कृषी केंद्र अशा गोंदिया तालुक्यातील ४१ व तिरोडा तालुक्यांतील ५० परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले.
"खते, बियाणे खरेदी करताना कृषी सेवा केंद्रांकडून पक्के बिले घ्यावे, त्यावरील नमूद एमआरपीप्रमाणे मालाची खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे, एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी. त्याची दखल घेऊन बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५, कीटकनाशक कायदा १९६८, कीटकनाशके नियम १९७१ नुसार संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल." - अजित आडसुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया