गोंदिया : जिल्ह्यातील गोरगरीब रूग्णांना आरोग्यसेवेचा लाभ घेता यावा तसेच त्यांना शस्त्रक्रि याही मोफत करता याव्यात यासाठी जिल्ह्यात लाईफ लाईन एक्स्प्रेस मे महिन्यात दाखल होणार आहे. या लाईफ लाईन एक्स्प्रेसचा लाभ जिल्ह्यातील अधिक रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आरोग्यसेवा कार्यक्रमांतर्गत ४ ते २५ मे दरम्यान गोंदिया येथे येणाऱ्या लाईफ लाईन एक्स्प्रेसच्या तयारीचा आढावा घेतांना सभेत जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवी धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीश कळमकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अरुण फटे, उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनचे डॉ.वैभव धाडकर, डॉ.मनीष बत्रा, नगरपालिका प्रशासन अधिकारी सी.ए. राणे, सेवाभावी संस्थेचे गोपाल अग्रवाल, राजेश बन्सोड, धर्मिष्ठा सेंगर, निर्मल अग्रवाल, आदेश शर्मा, अपूर्व अग्रवाल, दिव्या भगत, प्रमोद गुडधे, प्रतीक कदम, नवीन अग्रवाल, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, डॉ.बी.आर. पटले, महिला व बालकल्याण ए.एच. टेंभूरकर उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, लाईफ लाईन एक्स्प्रेसचा लाभ जिल्ह्यातील अधिक रुग्णांना घेता यावा यासाठी आतापासूनच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रु ग्णालयस्तरावर नियोजन करावे, रुग्णांना आणण्यासाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था करावी. सेवाभावी संस्थांनी तळागाळापर्यंत या एक्स्प्रेची माहिती पोहोचवावी. जिल्ह्यातील गरीब रूग्ण व विद्यार्थ्यांना तसेच शहरातील गलिच्छ वस्त्यातील नागरिकांना या एक्स्प्रेसच्या आरोग्य सेवेचा लाभ घेण्याबाबत माहिती पोहोचवावी. शाळेतील विद्यार्थ्यांपर्यत, महिला बचत गटांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यास यंत्रणांनी व सेवाभावी संस्थांनी काम करावे, असेही आवाहन करण्यात आले. आभार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते यांनी मानले. क्युरादेव फार्मास्युटिकल प्रा.लि.च्या सौजन्याने राज्य सरकारच्या मदतीने इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशन संचालित लाईफ लाईन एक्स्प्रेस ही जगातील पहिले चालते-फिरते रूग्णालय आहे. ही एक्स्प्रेस गरजू व गरीब लोकांसाठी वरदान आहे. यामध्ये प्रसिद्ध विशेष तज्ज्ञ डॉक्टर्स वेगवेगळ्या रुग्णांची तपासणी, उपचार व मोफत शस्त्रक्रि या करणार आहे. उपचारासाठी दाखल असणाऱ्या रुग्णांना मोफत औषधी, भोजन व राहण्याची व्यवस्थासुध्दा या एक्स्प्रेसमध्ये करण्यात येणार आहे. आरोग्यसेवा कार्यक्र मांतर्गत ४ ते २५ मे दरम्यान रुग्णांची प्राथमिक तपासणी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत करण्यात येईल. लाईफ लाईन एक्स्प्रेसमध्ये ५ ते ७ मे दरम्यान डोळ्यांचे परीक्षण व ६ ते १२ मे या कालावधीत डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रीया करण्यात येईल. (तालुका प्रतिनिधी)अशी आहे लाईफ लाईन एक्सप्रेस ४मोतीबिंदू असलेल्यांच्याच डोळ्यांची शस्त्रक्रिया शिबिरात सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत करण्यात येईल. १३ व १४ मे रोजी फाटलेले ओठ व भाजलेल्या शरीरावरील परीक्षण व उपचार करण्यात येईल. या रु ग्णांवर १४ ते १६ मे दरम्यान शस्त्रक्रिया करण्यात येईल. १७ ते १९ मे दरम्यान कानाचे विकार असलेल्या रु ग्णांचे परिक्षण करण्यात येईल. १८ ते २४ मे दरम्यान या रु ग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येईल. कानांच्या रूग्णांना परीक्षणात दिसून आलेल्या रोगानंतर कानाच्या पडद्याचे आॅपरेशन केले जाईल. १३ व १४ मे रोजी पोलिओ परीक्षण करण्यात येईल. १४ ते १६ मे रोजी १४ वर्षाखालील पोलिओ रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येईल. १७ ते २३ मे दरम्यान दातांचे परीक्षण व उपचार करण्यात येईल. यामध्ये दातांचे विकार असलेल्यांच्या दातांची सफाई, फिलिंग व खराब/कुजलेले दात काढण्याची प्रक्रि या केली जाईल. ६ ते ८ मे दरम्यान मिर्गी (फिट) रु ग्णांवर परिक्षण व उपचार करण्यात येईल. या रु ग्णांना तपासणीनंतर मोफत वैद्यकीय सल्ला व आवश्यक औषधी देण्यात येईल. स्त्रीरोग यावरसुद्धा परिक्षण व उपचार या एक्स्प्रेसमध्ये करण्यात येणार आहे.
आरोग्यासाठी लाईफ लाईन एक्स्प्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2016 4:16 AM