गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे अनेक कामे खोळंबली आहे. कोरोना संसर्गामुळे अनेकांचे वाहन चालविण्याचे लायन्ससेसचे नुतनीकरण करण्याचे राहून गेेले. त्यामुळे आता पुढे काय अशी चिंता वाहन चालकांना सतावित होती. लायन्सचे नुतनीकरण झाले नाही तर नवीन लायन्सस तर काढावे लागणार का असा प्रश्न सुध्दा वाहन चालकांसमोर निर्माण झाला होता. अखेर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने मागील वर्षी मार्चनंतर लायन्सस नुतनीकरणाची मुदत संपलेल्या सर्व लायन्ससधारकांना नुतनीकरणासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे हजारो लायन्सस धारकांना दिलासा मिळाला आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग सुरु असल्याने लायन्सस नुतनीकरणासाठी जाताना उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची अपाइंटमेंट घेऊन जावे लागणार आहे. तशी सोय देखील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने करुन दिली आहे. अपाइंटमेंट घेऊन गेल्यास वाहनचालकांची गैरसोय होणार नाही. लायन्स नुतनीकरणासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गर्दी होऊ नये यासाठी लायन्सस नुतनीकरणाला येणाऱ्यांसाठी कोटा देखील निश्चित करुन दिला आहे.
...............
अशी घ्या अपाइंटमेंट
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने लायन्सस नुतनीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ज्या दिवशी लायन्सस नोंदणी करण्यासाठी जायचे आहे. त्या तारखेवर सिलेक्ट करुन आणि दिलेल्या वेळेत कार्यालयात पोहचून लायन्ससचे नुतनीकरण करता येणार आहे.
..................
असा आहे कोटा
लायन्सस नुतनीकरणासाठी उपप्रादेशिक कार्यालयात येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कार्यालयाने दररोज ६० लायन्सस नुतनीकरणाचा कोटा निश्चित केला आहे. गर्दी वाढल्यास कोट्यात अधिक वाढ केली जाणार आहे. कार्यालयात येणाऱ्यांना आवश्यक ती काळजी घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. वाहन चालकांच्या सोयीसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
........
पहिल्या दोन दिवसात केवळ २५ वाहनांची नोदणी
गोंदिया जिल्ह्याचा अनलॉकच्या पहिल्याच स्तरात समावेश असल्याने साेमवारपासून जिल्ह्यातील सर्वच व्यवहार सुरळीतपणे सुरु झाले. त्यामुळे पहिल्याच दिवशी दहा आणि आज मंगळवारी दुसऱ्या दिवशी १५ वाहनांची नोंदणी झाली आहे. सर्व वाहनांचे शोरुम जवळपास दोन महिने बंद होते. त्यामुळे वाहनांची विक्री झाली नसल्याने नोंदणीसाठी प्रकरणे वाढली नाही. येत्या तीन चार दिवसात यात वाढ होऊ शकते.
...............
कोट
ज्या वाहन चालकांचे मागील वर्षीपासून लायन्सस नुतनीकरण करायचे राहिले आहे. त्यांना लायन्सस नुतनीकरणासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गर्दी वाढल्यास कोटा पण वाढवून देण्यात येणार आहे.
- विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.