शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

गोंदिया-बल्लारशा रेल्वे गाडीतून दारूची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 9:21 PM

दारूबंदी असलेल्या चंद्रपूर येथे रेल्वे मार्गे जाणारी दारू रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गोंडउमरी रेल्वे स्थानकावर पकडली. आरोपींजवळून १० पेट्या दारू जप्त केली. ही कारवाई १७ नोव्हेंबरला सायंकाळी ६.४० वाजता गोंदिया-बल्लारशा गाडी क्रमांक ५८८०४ मध्ये करण्यात आली.

ठळक मुद्देरेल्वेतून दारूच्या १० पेट्या जप्त : रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दारूबंदी असलेल्या चंद्रपूर येथे रेल्वे मार्गे जाणारी दारू रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गोंडउमरी रेल्वे स्थानकावर पकडली. आरोपींजवळून १० पेट्या दारू जप्त केली. ही कारवाई १७ नोव्हेंबरला सायंकाळी ६.४० वाजता गोंदिया-बल्लारशा गाडी क्रमांक ५८८०४ मध्ये करण्यात आली.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शामनगर बंगाली कॅम्प चंद्रपूर येथील विनोद राजेंद्र महतो (२५), मोहवाडा भद्रावती पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चंद्रपूर येथील नित्यानंद हरेंद्रनाथ राजवंशी (३९) यांचा समावेश आहे.ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे प्रभारी निरीक्षक एस. दत्ता, उपनिरीक्षक एस.एस.बघेल, मुख्य आरक्षक आर.सी. कटरे, एस.एस. बघेले, वी.एस. पटले यांनी केली. रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना दोन व्यक्ती गोंडउमरी रेल्वे स्थानकावरुन दोन प्लास्टीक पोत्यांमध्ये जड वस्तू गाडीत चढवित असल्याचे आढळले.त्यांनी चौकशी केल्यावर दोन पोत्यांमध्ये दहा पेटी दारु जप्त करण्यात आल्या.सदर दारुची किमत २६ हजार रुपये सांगितली जाते. सौंदड येथून दारु खरेदी करुन गोंडउमरी रेल्वे स्थानकावर ते पोहोचले.तिथून चंद्रपूरला जाण्यासाठी १७ नोव्हेंबरला ते बल्लारशाह-गोंदिया गाडीवर आले असताना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी पकडले.रेल्वे गाडीतून दारू तस्करीत वाढलगतच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असल्याने या जिल्ह्यात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारुची तस्करी सुरु आहे. पोलिसांची नजर चुकविण्यासाठी दारु तस्कारांनी गोंदिया-बल्लारशा मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा आधार घेतला आहे. गेल्या महिनाभरात रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे गाड्यांमध्ये पाळत ठेवून आठ ते दहा दारु तस्करांना मुद्देमालासह अटक केली आहे.नाकाबंदीवर प्रश्नचिन्हचंदपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असल्याने या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात वाहनांची तपासणी केली जाते. मात्र यानंतर सुध्दा ट्रक आणि इतर वाहनांतून सर्रासपणे दारुची वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या काही गावातून या दोन्ही जिल्ह्यात दारुची तस्करी होत आहे. त्यामुळे पोलीस विभागाच्या नाकाबंदी आणि तपासणीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.रेसुबने वाढविली गस्तमागील काही दिवसांपासून गोंदिया-बल्लारशा रेल्वे गाड्यांमधून दारुची तस्करी केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा बलाने गस्त वाढविली आहे. तसेच संशयीत सामानाची कसून चौकशी केली जात असल्यानेच दारु तस्करांच्या मुसक्या आवळण्यास मदत होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेliquor banदारूबंदी