लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी गोंदिया जिल्ह्यातील अवैध व्यवसायाविरूध्द कडक धोरण स्विकारलेले आहे. गोंदिया जिल्ह्यातून अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरीता विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखा हे विशेष प्रयत्नरत आहे. विशेष पथकाने केलेल्या कारवाईत लाखो रूपयाची दारू जप्त करण्यात आली. मंगळवारला विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस स्टेशन गोंदिया शहराच्या हद्दीत दोन ठिकाणी अवैध दारुची वाहतूक करतांना ५ इसमांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून देशी व विदेशी दारुच्या ५ पेट्या जप्त करण्यात आल्या. १८० मिलीचे २४१ पव्वे किंमती १७ हजार ९५ रूपये एक मोटारसायकल किंमत ३५ हजार असा एकूण ५२ हजार ९५ रूपयाचा माल आरोपींकडून जप्त करण्यात आला. गोंदिया शहर परिसरात भिमघाट स्मारक समोरील रसत्यावर नाकाबंदी दरम्यान आरोपी विजय सेवकराम वैरागडे (३३), विलास विठ्ठल उईके (२२) दोन्ही रा. आरटीओ आॅफीसच्या मागे फुलचूर नाका हे चार पेटीत देशी दारुचे १८० मिलीचे प्रत्येक पेटीत १९२ पव्वे किंमत ९ हजार ६०० रूपयाचा माल व एक मोटारसायकल एमएच३५/वाय-१३४४ ३५ हजार असा एकूण ४४ हजार ६०० रूपयाचा माल जप्त करण्यात आला. गोंदिया शहर ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन रस्त्यावर नाकाबंदी दरम्यान आरोपी दिपक परसराम मडावी (२९), मंगेश यशवंत नेताम (२४) रामेश्वर मनोहर मडावी (२९) तिन्ही.रा. नवेगावबांध प्रधानटोला हे विदेशी दारुची वाहतुक करतांना आरोपी १ कडे स्पोर्ट बँकमध्ये ओसी ब्लु चे १५ पव्वे, आरोपी २ कडे स्पोर्ट बँकमध्ये मॅक.डॉ न.१ चे २० पव्वे व आरोपी ३ कडे स्पोर्ट बँग मध्ये १४ पव्वे असा एकूण ४९ पव्वे प्रत्येकी १८० मिलीने भरलेले होते. या कारवाईत एकूण ७ हजार ४९५ रूपयाचा माल जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार चंद्रकांत करपे, पोलीस हवालदार श्यामकुमार डोंगरे, पोलीस नायक दुर्योधन हनवते, पोलीस शिपाई राकेश डोंगरवार, लखनलाल काटेंगा, लिलेंद्र बैस, शैलेश अंबुले, विनय शेंडे, स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली आहे.
विशेष पथकाने पकडली लाखो रूपयांची दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2017 12:14 AM