शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
2
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
3
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
4
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
6
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
7
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
8
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
9
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
10
“राहुल गांधीची भूमिका संविधान बचाओ, फडणवीसांना शहरी नक्षलवाद का वाटतो?”; काँग्रेसचा सवाल
11
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
12
'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे
13
"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"
14
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
15
'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?
16
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
17
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
18
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
19
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
20
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

फिरत्या लोकन्यायालयातून कायद्यांबाबत साक्षरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 1:07 AM

ऑनलाईन लोकमतबोंडगावदेवी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईच्या निर्देशानुसार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया, दिवाणी व फौजारी न्यायालय कनिष्ठ स्तर अर्जुनी मोरगाव व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बोंडगावदेवी येथे फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक साक्षरता शिबिर सार्वजनिक रंग मंदिरात घेण्यात आले.उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून अर्जुनी ...

ऑनलाईन लोकमतबोंडगावदेवी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईच्या निर्देशानुसार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया, दिवाणी व फौजारी न्यायालय कनिष्ठ स्तर अर्जुनी मोरगाव व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बोंडगावदेवी येथे फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक साक्षरता शिबिर सार्वजनिक रंग मंदिरात घेण्यात आले.उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून अर्जुनी मोरगाव न्यायालयाचे न्यायाधीश स्वप्नील रामटेके, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीकांत बबपुरकर, सचिव अ‍ॅड. तेजस कापगते, वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. पोमेश्वर रामटेके, सुमन शहारे, सरपंच राधेशाम झोळे, ग्रामसेवक एल.एम. ब्राम्हणकर उपस्थित होते.शिबिरात ग्रामस्थ व पक्षकारांना, ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला कायद्याची माहिती व्हावी, आपसातील वादासंबंधी न्यायालयीन प्रकरणे तडजोडीने गावात सोडवावे. दिवसेंदिवस न्यायालयीन प्रकरणांची संख्या वाढत आहे. पक्षकारांची न्यायालयातील पायपीट कमी व्हावी. मानसिक त्रास दूर व्हावा. प्रकरणांचा निपटारा गावातच दोन्ही पक्षकारांना समक्ष तडजोडीने करावा, यासाठी ‘न्यायालय आपल्या दारी’ हा उपक्रम राबवून गावागावात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या वेळी फिरते लोक न्यायालयात फौजदारी १२ व दिवाणी ४ असे १६ न्यायालयीन प्रकरणे घेण्यात आली.प्रास्ताविक अ‍ॅड. पोमेश रामटेके यांनी मांडले. संचालन व आभार ग्रामसेवक ब्राम्हणकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी न्यायालयीन कर्मचारी जी.एम. सेवलकर, जी.सी. ठवकर, विलास हुमणे, हर्षल हर्षे, बीट अमलदार कन्नाके, पो.ह. बोरकर व ग्रामपंचायत कर्मचाºयांनी सहकार्य केले.स्त्री भ्रूणहत्येचे पाप आपल्या माथी मारू नकामहिला सल्लागार सुमन शहारे म्हणाल्या, महिलांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी विविध कायद्यांचे पाठबळ आहे. स्वत:मधील आत्मविश्वास जागविण्याचे धाडस प्रत्येक महिलने करावे. महिलांवर झालेल्या अन्यायाचा निपटारा करण्यासाठी अहंपणा बाजूला सारुन तडजोडीसाठी आपल्या गावामध्ये आलेल्या लोकन्यायालयाचा फायदा घ्यावा. गर्भलिंग कायदा अंमलात आहे. महिलांनी गर्भलिंग निदान करु नये. स्त्रीभ्रूण हत्येचे पाप आपल्या माथी लावू नका. आजघडीला पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण कमी आहे. आयुष्य घडविणाºया शूर महिलांनी मुलींच्या जन्माचे स्वागत करावे, असे त्यांनी सांगितले.