शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

५६३७ लोकांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2017 12:16 AM

नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी केंद्र सरकारतर्फे राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु करण्यात आली.

 जीवन फुलले : राजीव गांधी जीवनदायी योजनेतून उपचार लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी केंद्र सरकारतर्फे राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु करण्यात आली. या योजनेला आता महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजनेच्या नावाने चालविण्यात येत आहे. मागील साडे तीन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ५ हजार ६३७ लोकांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत ३१ नोव्हेंबर २०१३ ते ३१ मे २०१७ दरम्यान १५ हजार ५५८ कुटूंबाचे कार्ड तयार करण्यात आले. या अंतर्गत ४६ हजार ३४७ लाभार्थ्यांचा समावेश आहे. अंत्योदय कार्डामध्ये २२१, अन्नपूर्णा ८, केशरी रंगाचे ९ हजार ३९३ व पिवळ्या रंगाचे ५ हजार ९३६ कुटूंबाचा समावेश आहे. जिल्ह्याच्या ५हजार ६३७ लाभार्थी रेशन कार्डात ७ हजार ९०७ लोकांना जिल्हा व जिल्ह्याबाहेर आरोग्य सेवेचा लाभ घेण्यात येईल. या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हा व बाहेरील जिल्ह्यातील ज्या रुग्णालयामध्ये ही सेवा दिली जाते. त्या रुग्णालयांना आतापर्यंत १६ कोटी ७० लाख ५५ हजार ७७५ रुपये देण्यात आले आहे. हृदयरोग, मेंदूरोग, कर्करोग व इतर आजारावर उपचार केला जातो. गोंदिया जिल्ह्यातील ३ हजार १३९ लाभार्थ्यांचे ३ हजार ६८८ प्रकरण मंजूर करण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्यात ज्या रुग्णालयांनी उपचार केला त्यांना ५ कोटी ४९ लाख ९३ हजार ९५० रुपये देण्यात आले आहे. जखमी, गर्भाशय, अपेडीक्स, अल्सर, पथरी, अशा आजारांचा उपचार करण्यात आला. ९७२ आजारांवर उपचार दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्या गरीब कुटूंबाना सेंद्रीय कार्ड धारकांना राजीव गांधी जीवनदायी योजना (महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजना) योजनेचा लाभ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय व महिला जिल्हा रुग्णालयात देण्यात येते. या योजनेअंतर्गत ९७२ उपचार, थेरेपी, २१२ शस्त्रक्रिया व ३० विशेष श्रेणीचा समावेश आहे. कुटूंब प्रमुखांच्या नावाने तयार करण्यात येणाऱ्या कार्डावर मोफत उपचार केला जातो. यासाठी रुग्णालयात टोल फ्री नंबर व आरोग्य मित्र ठेवण्यात आले आहेत. ग्रामीण भागात जनजागृती शासनातर्फे गरीब गरजूंना आरोग्याची सुविधा देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. परंतु ग्रामीण भागातील अनेक लोक या योजनेपासून अनभिज्ञ आहेत. माहिती अभावी खूप कमी लोकांनी आपले कार्ड तयार केले आहेत. गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असूनही गरीब गरजूंना याचा लाभ मिळावा यासाठी प्रचार प्रसार करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत वर्षभरात कुटूंबातील कोणतेही सदस्यासाठी दिड लाख रुपयापर्यंतचा उपचार करण्याची मुभा आहे. नामवंत कंपन्यानी या योजनेत सहभाग घेतला आहे. किडणी प्रत्यारोपणासाठी अडीच लाखापर्यंत मर्यादा आहे. ही योजना मोफत आहे. उपचार व औषधी, भोजन व घरापासून रुग्णालयापर्यंत पोहचण्याची व्वयस्था तसेच उपचारानंतर १० दिवस मोफत औषधी देण्याचे प्रावधान आहे. डॉ. स्मीता घरडे, जिल्हा समन्वयक गोंदिया