लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत जिल्ह्यातील २९ हजार ५३ शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आधार लिंकिंग झालेल्या जिल्ह्यातील ११७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बुधवारी (दि.२६) कर्जमाफीची ३९ लाख ८ हजार ९३२ रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सोमवारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावातील गावातील कर्जमुक्तीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची निवड करुन यादी जाहीर करण्यात आली.यात गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार आणि कट्टीपार येथील १५६ शेतकऱ्यांचा समावेश होता.या शेतकऱ्यांचे आधारकार्ड लिंक करुन त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम ४८ तासात जमा करण्यात येणार होती. यात गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया झालेल्या कट्टीपार आणि मुंडीपार येथील एकूण ११७ शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची ३९ लाख ८ हजार ९३२ रुपयांची रक्कम जमा केली.यामुळे ऐवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेस जिल्ह्यातील एकूण २९ हजार ५३ शेतकरी पात्र ठरले आहे. यापैकी १९ हजार १११ शेतकºयांचे आधारकार्ड लिंक त्यांच्या बँक खात्याशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर १८ हजार ६१३ शेतकऱ्यांचे आधारकार्ड लिंक करुन ते शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम सुरू आहे.२८ फेब्रुवारीपर्यंत हे संपूर्ण काम पूर्ण होणार असून त्यानंतर या शेतकºयांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे जिल्हा निबंधक एस.पी.कांबळे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.दुसरी यादी उद्या जाहीर होणारशासनाने दिलेल्या निर्देशानुसार महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी २८ फेब्रुवारी जाहीर करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील १८ हजारावर शेतकऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यादी जाहीर झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे.नियमित कर्जफेड करणाऱ्याना प्रतीक्षामहाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अद्यापही कुठलीही योजना जाहीर केलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांबाबत सरकार नेमका काय निर्णय घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.जिल्हा बँक आघाडीवरशेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवून देण्यात आणि यासाठीची प्रक्रिया राबविण्यात गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर आहे. या बँकेने ४८ तासात ११७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली.
११७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 6:00 AM
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकºयांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सोमवारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावातील गावातील कर्जमुक्तीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची निवड करुन यादी जाहीर करण्यात आली.
ठळक मुद्दे४८ तासात जमा झाली रक्कम : कर्जमुक्ती योजना