शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

कर्ज परतफेडीत महिला प्रामाणिक

By admin | Published: June 15, 2017 12:22 AM

केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ बचतगटातील महिलांनी घ्यावे.

उषा मेंढे : आमगाव येथे वार्षिक सभा व प्रधानमंत्री मुद्रा बँक मेळावा लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ बचतगटातील महिलांनी घ्यावे. बचतगटातील महिला आता संघटीत झाल्या असून स्वावलंबनाच्या दृष्टीने त्या उद्योग व्यवसायाकडे वळत आहेत. बँकांनी आता त्यांना पूर्णपणे स्वावलंबी करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध करून द्यावे. महिला कर्जाची परतफेड प्रामाणकिपणे करतात, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले. महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व तहसील कार्यालय आमगाव यांच्या संयुक्त वतीने मंगळवारी, १३ जून रोजी आमगाव येथील लक्ष्मणराव मानकर फार्मसी कॉलेज येथे स्वावलंबन लोकसंचालित साधन केंद्र आमगावची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी उदघाटक म्हणून मेंढे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, माजी आमदार केशवराव मानकर, माजी जि.प. सभापती सविता पुराम, पं.स. सदस्य छबू उके, सिंधू भूते, गटविकास अधिकारी पांडे तर मार्गदर्शक म्हणून जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिलकुमार श्रीवास्तव, कनिष्ठ कौशल्य व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी सुरेश गणराज, उद्योग निरिक्षक राठोड, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांची उपस्थिती होती. मेंढे पुढे म्हणाल्या, घरच्या कर्त्या पुरूषाला आर्थिक सहकार्य करण्याचे कामही बचतगटातील महिला करतात. संकट काळात महिलेने जमा केलेला पैसा उपयोगी पडतो. एक-एक रूपयाची बचत करून ती पैसा जमा करते. नोटबंदीच्या काळात महिलांनी खऱ्या अर्थाने बचत केलेला पैसा उपयोगी पडला. माविमच्या माध्यमातून जिल्ह्यात महिलांच्या बचतगटाच्या स्थापनेतून महिलांचे मोठ्या प्रमाणात संघटन झाले आहे. गोंदिया जिल्हा निसर्ग संपन्न असल्यामुळे बचतगटातील महिलांनी वनावर आधारित विविध व्यवसाय सुरु करु न स्वावलंबनाचा मार्ग शोधला आहे. महिला आता अबला राहिल्या नसून त्या सबला झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजनांचा लाभ बचतगटातील महिलांनी घ्यावा, असे त्या म्हणाल्या. केशवराव मानकर म्हणाले, ज्या व्यक्तींना स्वत:चा रोजगार उभा करून स्वावलंबी व्हायचे आहे, त्यांच्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना अत्यंत उपयुक्त आहे. बेरोजगार तरु ण-तरु णी व गरजू व्यक्तींना स्वबळावर उभे करण्यासाठी मुद्रा योजना आशेचा किरण आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी मोठी तरतूद केली आहे. कौशल्य विकसीत करु न स्वावलंबी करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. फार कमी महिलांनी जनधन योजनेचे खाते उघडले असून मोठ्या प्रमाणात त्या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त महिलांनी जनधन योजनेचे खाते उघडावे, असे ते म्हणाले. डॉ.भूजबळ म्हणाले, प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी व सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची मोठी चळवळ उभी राहिली आहे. जिल्ह्यात काही मायक्रो फायनान्स कंपन्या महिलांना मोठ्या व्याजदराचे कर्ज देवून वसुलीसाठी त्रास देत आहेत. सुसूत्रतेने प्रधानमंत्री योजनेतून महिलांना कर्ज उपलब्ध झाले पाहिजे. दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या बचतगटातील महिलांना पोलीस विभाग सहकार्य करेल. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत जिल्ह्यात चांगले काम झाले आहे. दारूबंदीसाठी महिलांनी जिल्ह्यात चांगली भूमिका बजावली असल्याचे सांगून डॉ.भूजबळ म्हणाले, महिला केवळ घरच्या अर्थमंत्रीच नव्हे तर त्या चांगल्या कायदेमंत्रीदेखील आहेत. घरी महिला जे सांगतील, जे ठरवतील तोच निर्णय होत असतो. अर्थकारण, समाजकारण व राजकारणात देखील महिला महत्वाची भूमिका बजावत आहेत. माविमच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यात येत आहे. पोलिसांची भूमिका केवळ कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच गुन्ह्यांचा तपास करणे एवढीच नाही तर चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कामही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सविता पुराम यांनी विविध योजनेविषयी, तहसीलदार साहेबराव राठोड यांनी महसूल विभागाच्या योजना, गणराज व राठोड यांनी रोजगार व कौशल्य विकासाच्या विविध योजनांची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी उपस्थित महिलांचे प्रबोधन केले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत कॅनरा बँक, बँ आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडिया आदींनी बचतगटांच्या महिलांना शिशू गटातून कर्ज प्रकरणाचे मंजुरीपत्र तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या महिला लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलवर असंख्य महिलांनी हिमोग्लोबीनची तपासणी केली व कमी हिमोग्लोबीन असलेल्या महिलांचे यावेळी समुपदेशन करण्यात आले. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंदू वंजारी, वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी जनईकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. मान्यवरांच्या हस्ते स्वावलंबन लोकसंचालित साधन केंद्र आमगाव सन २०१६-१७ वार्षिक प्रगती अहवाल पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. स्वावलंबन लोकसंचालित साधन केंद्र आमगावची वार्षिक सर्वसाधारण सभा देखील यावेळी पार पडली. या सभेत सन २०१६-१७ चा प्रगती अहवाल मांडण्यात आला. अध्यक्षस्थानी स्वावलंबन लोकसंचालित साधन