लोधी समाजात रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी भुजली विसर्जन ही एक जुनी परंपरा आहे. यात बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाची आख्यायिकासुद्धा जोडण्यात येते. बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाची आठवण म्हणून लोधी समाजात भुजली विसर्जनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. या समाजातील महिला रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. हीच परंपरा अबाधित राखून ईर्री येथील महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. यावर्षी विविध रंगारंग कार्यक्रमांचा समावेश देखील करण्यात आला. यावेळी भुजली विसर्जनाची गावातून मिरवणूक काढून गावतलावावर भुजली विसर्जन करण्यात आले. यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी सरिता बिरनवार, जैतुरा दमाहे, धर्मशिला उपवंशी, दुर्गा ठकरेले, अजवंती उपवंशी, गीता नागपुरे, प्रमिला उपवंशी, दुर्गा कमल ठकरेले, कुमारी लिल्हारे, छोटी बनोटे, मुन्नी ठकरेले, भागन ठकरेले, प्रांता ढेकवार, श्यामा दमाहे, उर्मिला उपवंशी, भोजवंता ठकरेले, रमुला उपवंशी यांनी सहकार्य केले.
लोधी समाजाने जोपासली भुजली विसर्जनाची परंपरा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:34 AM