सोनपुरी : येणाऱ्या ४ व ५ डिसेंबरला दिल्लीमध्ये आयोजित लोधी महोत्सवसाठी लोधी समाज संघर्ष समिती सालेकसाची बैठक रानी अवंतीबाई लोधी समाजभवन कावराबांध येथे पार पडली. अध्यक्षस्थानी माजी पं.स. सभापती यादनलाल बनोठे होते. बैठकीत दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये होणारे लोधी महोत्सव व स्वामी ब्रम्हानंद लोधी महाराज यांची १२२ वी जयंती आणि लोधी समाज अधिकार जन आंदोलनची माहिती देण्यात आली. या वेळी माजी आ. भेरसिंह नागपुरे, जि.प. सदस्य कुंदन कटारे, पं.स. सदस्य भरत लिल्हारे, गोंदियाचे पं.स. सदस्य योगराज उपराडे, माजी पं.स. सभापती खेमराज लिल्हारे, लोधी समाज उपाध्यक्ष पांडुरंग मुटकुरे, राजीव ठकरेले, नंदकिशोर बिरनवार, शिवराम सव्वालाखे उपस्थित होते.लोधी समाजाला केंद्राच्या सूचीमध्ये इतर मागासवर्गमध्ये समाविष्ट करण्यासाठी जनआंदोलनासाठी १७ आॅक्टोबरला तहसील कार्यालयावर मोर्चा काढणे, राणी अवंतीबाई लोधी यांचा इतिहास शासकीय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणे, रानी अवंतीबाई लोधी यांच्या जन्मदिन व बलिदान दिन शासनस्तरावर साजरा करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. १७ आॅक्टोबरला सालेकसा तालुक्याचे लोधी समाजाचे मोर्चाचे आयोजन दुपारी २ वाजता करण्यात आले आहे.लोधी महोत्सव दिल्लीचे प्रभारी राजीव ठकरेले यांनी सभेत सांगितले की लोधी महोत्सवात देशातील १८ राज्यांचे लोधी समाजाचे पदाधिकारी व नागरिक ४ व ५ डिसेंबरला दिल्ली येथे पोहोचतील. ४ डिसेंबरला लोधी महोत्सव व ५ डिसेंबरला लोधी समाजाला केंद्राची सूचीमध्ये इतर मागासवर्ग प्रवर्गात सामिल करण्यासाठी जंतरमंतर मैदान व लोधी अधिकार महोत्सवात येणारे सर्व लोकांचे भोजन आणि निवासची व्यवस्था नि:शुल्क करण्यात आली आहे. सभेत आयोजक लक्ष्मण नागपुरे, माजी सरपंच गजानन मोहारे, डॉ. अशोक दमाहे, प्रा. जागेश्वर लिल्हारे, टी.आर. लिल्हारे, ओंकार लिल्हारे, राजकुमार बसोने, पुरुषोत्तम बनोठे, उपसरपंच हेमराज सुलाखे, जी.एन. लिल्हारे, सियालाल उपराडे, जी.जी. दमाहे, भिवराम दमाहे, बाबा दमाहे, सुखदास बसोने, शंकर नागपुरे, रोशन गराडे, देवेंद्र मच्छिरके, लेकसिंग मस्करे, चरण डहारे, ढेकवार, पुनाराम मोहारे, झाडुलाल मस्करे, शंकर डहारे, हिरामण मच्छिरके, कृष्णकुमार मच्छिरके, भरत नागपुरे, पुरण दसरिया, माणिक नागपुरे, सुखदेव रत्नाकर, खिलेश दमाहे, मनोज बनोठे, गुमानसिंग उपराडे, तोडचंद दसरिया, शेरसिंग मच्छिरके, राजकुमार दमाहे, आर.वाय. मस्करे, लक्ष्मण दसरिया आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वाय.सी. बसोने यांनी केले. आभार प्रदर्शन आर.एम. लिल्हारे यांनी मानले. (वार्ताहर)
लोधी अधिकार जनआंदोलन
By admin | Published: October 13, 2016 1:55 AM