यावेळी सत्र २०२१-२०२२ मध्ये शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सर्व शाळांच्या शाळा समिती, शाळा सुधार समिती व शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली. याप्रसंगी विद्येची देवता माता सरस्वती व छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या छायाचित्रांचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जगदीश लोहिया यांनी, शिक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण परिवर्तन घडविण्याचा ध्यास राजर्षी शाहू महाराजांच्या चरित्रातून मिळतो. त्यानुसार शिक्षणाच्या सर्व सोयी-सुविधा परिसरात विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करण्याची प्रेरणा मिळाली, असे मत व्यक्त केले. यावेळी प्रामुख्याने संस्था उपाध्यक्ष आ.न. घाटबांधे, सदस्य पंकज लोहिया, नलीराम चांदेवार, ओ.बी. बिसेन, प्रल्हाद कोरे, पर्यवेक्षिका कल्पना काळे, प्राचार्य गुलाबचंद चिखलोंढे, मुख्याध्यापक मनोज शिंदे उपस्थित होते. सहायक शिक्षक डी.एस. टेंभुर्णे व टी.बी. सातकर यांनी यावेळी माहिती दिली. संचालन मुख्याध्यापक मनोज शिंदे यांनी केले. आभार दरवडे यांनी मानले. यावेळी विद्यालयातील समित्यांचे पदाधिकारी व सदस्य तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (शाहू)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:19 AM