शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

Lok Sabha Election 2019; भाजप सेनेत समन्वयाचा अभाव, मात्र प्रचारात सक्रिय सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 10:07 PM

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. तर भाजप-सेनेत युती झाल्याने भंडारा-गोंदिया मतदाससंघातील शिवसैनिकांनी ‘मातोश्री’वरुन आलेल्या युती धर्माच्या आदेशाचे पालन करीत भाजप उमेदवाराचा प्रचाराला सुरूवात केली आहे.

ठळक मुद्दे‘हम साथ साथ है’ : विधानसभेवर डोळा ठेवत प्रचार सुरू, शिवसैनिक प्रचारार्थ मैदानात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. तर भाजप-सेनेत युती झाल्याने भंडारा-गोंदिया मतदाससंघातील शिवसैनिकांनी ‘मातोश्री’वरुन आलेल्या युती धर्माच्या आदेशाचे पालन करीत भाजप उमेदवाराचा प्रचाराला सुरूवात केली आहे. मात्र मतदानाला केवळ पाच दिवस शिल्लक असताना अद्यापही दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सर्व काही आॅलबेल आहे असे दिसून येत नाही. पण यामुळे शिवसैनिकांनी गप्प बसू न राहता युतीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे. सभा, रॅलीमध्ये सुध्दा त्यांचा सहभाग दिसून येत आहे.गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात शिवसेनेचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. सध्या या दोन्ही जिल्ह्यातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयातूनच निवडणूक प्रचाराची धूरा सांभाळली जात आहे. गोंदिया जिल्ह्यात गोंदिया शहर वगळता इतर ठिकाणी अद्यापही शिवसेनेचे प्रचार कार्यालये उघडली नाही. मात्र शिवसैनिक भाजप उमेदवाराच्या प्रचार सभा आणि रॅलीमध्ये सहभागी होऊन प्रचार करीत आहे. प्रचार कार्यालये नसले तरी शिवसैनिक एकदिलाने मतदारांशीे संवाद साधत प्रचार करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. युती धर्माच्या आदेशाचे पालन करीत वरिष्ठ पातळीवर जरी नेत्यांचे मनोमिलन झाले असले तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलनाचा थोडाफार अभाव दिसून आला.शिवसेनेला फारसे विचारत घेतले जात नसल्याने शिवसैनिकांमध्ये थोडीफार नाराजी सुध्दा आहे. पण या दोन्ही पक्षाच्या प्रचार कार्यालयातील वातावरण ‘निवडणुकी’ पुरते का होईना अनुकुल दाखविले जात आहे. तर शिवसैनिक सुध्दा यासर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून सहा महिन्यांने होणाऱ्या निवडणुकांकडे पाहत प्रचाराला भिडले आहेत.विशेष म्हणजे वाढत्या उन्हाच्या झळा लक्षात घेऊन शिवसैनिक सकाळीच कार्यालयात पोहचून प्रचाराचे नियोजन करुन कार्यालयाबाहेर पडत असल्याचे चित्र पाहयला मिळाले. एकंदरीत अंतर्गत मनभेद असले तरी प्रचारावर त्याचा परिणाम होऊ नये याची काळजी घेत आहेत.विधानसभा मतदारसंघातील मित्रपक्षाच्या कार्यालयांत काय दिसले?१. गोंदिया : येथे शिवसेनेचे स्वतंत्र कार्यालय असून सकाळपासूनच शिवसैनिकांची वर्दळ सुरू होते. प्रचाराचे नियोजन करुन शिवसैनिक बाहेर पडत असल्याचे दिसले.२.साकोली : शिवसेने स्वतंत्र कार्यालय उघडले नाही. मात्र भाजपच्या कार्यालयात शिवसैनिक सकाळी एकत्र येतात.भाजपच्या नियोजनानुसार प्रचारात सहकार्य करतात.३. तिरोडा. : तिरोडा येथे शिवसेनेचे स्वतंत्र प्रचार कार्यालय नाही. मात्र येथील पदाधिकाऱ्यांच्या घरुनच प्रचाराची धुरा सांभाळली जात असून शिवसैनिक येथूनच प्रचारासाठी जातात.४. तुमसर : येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुखाच्या कार्यालयातून प्रचाराची सुत्रे हलतात, शिवसैनिक एकत्र येतात, भाजपशी समन्वय साधून नियोजन करताना दिसले.५. अर्जुनी मोरगाव : येथे सुध्दा शिवसेनेचे स्वतंत्र प्रचार कार्यालय नसून शिवसैनिक भाजपच्या कार्यालयात शिवसैनिक सकाळी एकत्र येवून प्रचाराचे नियोजन करतात.६. भंडारा : शिवसेना जिल्हा कार्यालयात शिवसैनिकांची सकाळपासून वर्दळ दिसते. जिल्हा प्रमुखांच्या निर्देशानुसार प्रचाराचे नियोजन होते.मित्र पक्ष आमच्या सोबतकोणताही किंतू परंतु मनात न ठेवता शिवसेना आणि आरपीआयचा आठवले गट आमच्यासोबत प्रचारात मेहनत घेत आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे यासाठी सर्व घटक पक्ष आपल्यासोबत आहे.- सुनील मेंढे, उमेदवार, भाजपयुती धर्माचे पालनयुती धर्म पाळण्यासाठी आम्ही भाजपसोबत सुरूवातीपासूनच आहोत. प्रचाराचे स्वतंत्र नियोजन करुन जि.प.क्षेत्रनिहाय आम्ही दौरे करीत आहोत. नेत्यांच्या सभांना ही आम्ही उपस्थित राहत आहोत.-मुकेश शिवहरे,जिल्हा प्रमुख, शिवसेना

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgonda-pcगोंडाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019