लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभेच्या भंडारा-गोंदिया मतदार संघात राष्ट्रवादी आणि भाजपात थेट लढत होत आहे. मात्र भाजपाच्या उमेदवारापुढे स्वपक्षातील बंडखोराचे आवाहन उभे आहे. माजी खासदार खुशाल बोपचे यांना राजी करण्यात भाजपाला यश आले असले तरी दुसऱ्या बंडखोराकडे दुर्लक्ष करणे भाजपाला या निवडणुकीत महाग पडणार आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपाचे सुनील मेंढे आणि राष्टÑवादीचे नाना पंचबुध्दे यांच्यासह बहुतांश उमेदवार नवख्खे आहेत. चिन्ह वाटपानंतर गुरुवारपासून प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. केवळ १२ दिवसात १६०० गावांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पोहचण्याचे प्रयत्न दोन्ही उमेदवार करत आहेत. मात्र भाजपाला बंडखोरीचे ग्रहन लागले आहेत. भाजपाचे माजी खासदार खुशाल बोपचे आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी नामांकन दाखल करुन खळबळ उडून दिली. माजी खासदार बोपचे यांना वेळेवर राष्ट्रहिताची उपरती झाल्याने त्यांनी नामांकन मागे घेतले. मात्र प्रत्येकवेळी आश्वासन देऊनही निराशा पदरी पडणाºया राजेंद्र पटले यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. आता पटले यांची उमेदवारी भाजपाच्या मतांचे विभाजन करणार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहे.
Lok Sabha Election 2019; बंडखोरीमुळे भाजपाला मतविभाजनाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 10:20 PM
लोकसभेच्या भंडारा-गोंदिया मतदार संघात राष्ट्रवादी आणि भाजपात थेट लढत होत आहे. मात्र भाजपाच्या उमेदवारापुढे स्वपक्षातील बंडखोराचे आवाहन उभे आहे. माजी खासदार खुशाल बोपचे यांना राजी करण्यात भाजपाला यश आले असले तरी दुसऱ्या बंडखोराकडे दुर्लक्ष करणे भाजपाला या निवडणुकीत महाग पडणार आहे.
ठळक मुद्देभंडारा-गोंदिया लोकसभा : दुर्लक्ष करणे भाजपाला पडणार महागात