लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशातील जनतेने मोठ्या अपक्षेने भाजप सरकारला संधी दिली. मात्र त्यांनी प्रत्येक वर्गाला धोका देण्याचे काम केले. ५ वर्षातील चुकीच्या कामांमुळे देशात औद्योगीक व कृषी क्षेत्रात विकास ठप्प झाला. प्रधानमंत्र्यांनी वर्षाला २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले. मात्र युवांना रोजगार देण्यात भाजप अपयशी ठरल्याची टीका आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली.गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्राम चुलोद, आसोली, नवरगाव खुर्द, तुमखेडा खुर्द, पोवारीटोला, गुदमा, मोरवाही, इर्री, नवरगाव कला, मुंडीपार, बटाना, अंभोरा, हिवरा, जब्बारटोला, पांढराबोडी, नवेगाव, कटंगटोला,नागरा, कटंगी, टेमनी, बरबसपुरा, सावरी, रावणवाडी, अर्जुनी, चारगाव, सिरपूर व मोगर्रा येथे कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस-आरपीआय- पिरिपा-खोरिपाचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, सभापती रमेश अंबुले, विमल नागपुरे, विजय लोणारे, माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद काडे, बंटी भेलावे, संदेश भालाधरे, कैलाश सुरसाऊत यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, कॉँग्रेस शासन काळात रेशन दुकानात गरीबांना स्वस्त भावात मिळणारी डाळ, साखर व केरोसीन आता भाजपने बंद केले. जिल्ह्यात मोठ्या संख्येत रेती-मुरूमाचे काम करणाऱ्या लहान व्यापाऱ्यांना ४ हजार ५०० रूपये दंड आकारला जात होता.आज भाजपच्या काळात प्रत्येक ट्रॅक्टर मालकाला १ लाख १५ हजार रूपये दंड ठोठावला जात आहे. भाजपच्या काळात लहान व्यापारीही टिकू शकत नसल्याचे सांगितले.
Lok Sabha Election 2019; युवकांना रोजगार देण्यात भाजप सरकार अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:40 PM
देशातील जनतेने मोठ्या अपक्षेने भाजप सरकारला संधी दिली. मात्र त्यांनी प्रत्येक वर्गाला धोका देण्याचे काम केले. ५ वर्षातील चुकीच्या कामांमुळे देशात औद्योगीक व कृषी क्षेत्रात विकास ठप्प झाला. प्रधानमंत्र्यांनी वर्षाला २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले.
ठळक मुद्देग्रामीण भागात गोपालदास अग्रवाल यांची प्रचारसभा