गोंदिया : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान गुरूवारी (दि.११) घेण्यात आले. यात जिल्ह्यातील आमदार आणि प्रमुख नेत्यांनी सकाळीच मतदान केंद्रावर पोहचून मतदानाचा हक्क बजाविला. तर जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी फुलचूर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविला.मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर मतदान केल्याची खूण दाखवितांना लोकप्रतिनिधी व नागरिक. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान करण्यासाठी मतदारांची गर्दी झाली होती. यात महिला आणि नवमतदारांचा सर्वाधिक सहभाग होता. निवडणूक विभागाने मतदार केंद्रावर दिव्यांगासाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्याचा दावा केला होता तो अर्जुनी मोरगाव तालुक्यातील घोनाडी येथील मतदान केंद्रावर पूर्णपणे फोल ठरला.व्हीलचेअर नसल्याने दोन महिलांनाच मुलीला मतदान करण्यासाठी उचलून आणावे लागले. तर कुंभीटोला येथील अमित कावळे याने विवाहबध्द झाल्यावर मतदान केंद्रावर पोहचून मतदानाचा हक्क बजाविला. सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांना मतदान केंद्रावर पोहचण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली होती.वृध्दांना व्हिलचेअरवर मतदानाकरिता नेण्यासाठी तरुणांनी अशी मदत केली.सखी मतदान केंद्रावर चर्चा करताना निवडणूक निरीक्षक पार्थसारथी मिश्रा.
Lok Sabha Election 2019; लोकशाहीचा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:07 AM