लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा निवडणुकीच्या विदर्भातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी ११ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाच्या दोन दिवस आधी जाहीर प्रचार बंद होते. त्यामुळे मंगळवारी (दि.९) सर्वच राजकीय पक्षांनी मोटारसायकल रॅली, पदयात्रा आणि प्रचारसभांचा धडका लावला होता. यासर्व माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ दिसून आली. एकंदरीत रॅली, प्रचार सभा आणि मोटारसायकल रॅलीने मंगळवार गाजल्याचे चित्र होते.लोकसभा निवडणुकीला घेवून मागील १३ दिवसांपासून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सकाळी ८ वाजतानंतर विविध पक्षांच्या उमेदवाराच्या निवडणूक प्रचारार्थ भोग्यांनी मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले होते.उमेदवारांनी आपल्या पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रचारसभा, पदयात्रा आणि मोटारसायकल रॅलीचा आधार घेतला होता.प्रचारासाठी कमी कालावधी मिळाल्याने मागील दहा दिवस उमेदवारांचे संपूर्ण कुुटुंबीय सुध्दा प्रचारात उतरले होते. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात एकूण १६०० गावे असून या गावांतील मतदारांपर्यंत पोहचण्याचा सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे मागील १२ दिवसांपासून ग्रामीण भागात निवडणुकीच्या निमित्ताने लोकशाहीचा उत्सव पाहयला मिळाला.निवडणूक आचारसंहितेनुसार मतदानाच्या दोन दिवस आधी जाहीर प्रचार बंद होत असल्याने मंगळवारी (दि.९) सकाळपासूनच सर्वच पक्षांनी रॅली, पदयात्रा आणि मोटारसायकल रॅली व प्रचारसभा घेवून मतदारांपर्यंत पोहचण्या प्रयत्न केला. त्यामुळे मागील बारा दिवस मतदार संघात जेवढी निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण पाहयला मिळाले नाही ते मंगळवारी पाहयला मिळाले.आता थेट संर्पकावर भरमंगळवारपासून जाहीर प्रचार बंद झाला असून आता उरलेल्या दोन दिवसात थेट मतदारांशीे संपर्क साधण्यावर उमेदवार आणि त्यांच्या पक्षाचा भर असणार आहे. तर मागील दहा दिवसांपासून सुरू असलेला भोग्यांचा आवाज सुध्दा आता पूर्णपणे बंद झाला आहे.बुथ कमिट्यांवर लक्षसर्वच राजकीय पक्षानी निवडणुकीचे योग्य व्यवस्थापन केले.तर अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येक गावात बुथ कमिट्या तयार केल्यात. या बुथ कमिट्यांवर विजयाचे समीकरण तयार करण्याकडे उमेदवार आणि नेत्यांचे लक्ष आहे.
Lok Sabha Election 2019; रॅली, प्रचार संभानी गाजला मंगळवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 10:42 PM
लोकसभा निवडणुकीच्या विदर्भातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी ११ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाच्या दोन दिवस आधी जाहीर प्रचार बंद होते. त्यामुळे मंगळवारी (दि.९) सर्वच राजकीय पक्षांनी मोटारसायकल रॅली, पदयात्रा आणि प्रचारसभांचा धडका लावला होता.
ठळक मुद्देजाहीर प्रचार बंद : थेट मतदारांशी संपर्कावर उमेदवारांचा भर, आता लक्ष मतदान प्रक्रियेकडे