शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

Lok Sabha Election 2019; चेहऱ्यांमागील खरे मुखवटे व हिरो वेगळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 10:02 PM

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून यंदा प्रथमच युतीने नवखा तर महाआघाडीने ज्येष्ठ उमेदवार दिला आहे. मतदारांसाठी उमेदवारांचे चेहरे नवीन असले तर या चेहऱ्यांमागील खरे मुखवटे आणि हिरो वेगळेच आहेत. ही निवडणूक सुध्दा या मुखवट्यांभोवती फिरत आहे. रिंगणात जरी उमेदवार असले तरी या मागे असलेल्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीचे मॅनेजमेंट : कार्यकुशलतेसह प्रतिष्ठा सुद्धा पणाला,

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून यंदा प्रथमच युतीने नवखा तर महाआघाडीने ज्येष्ठ उमेदवार दिला आहे. मतदारांसाठी उमेदवारांचे चेहरे नवीन असले तर या चेहऱ्यांमागील खरे मुखवटे आणि हिरो वेगळेच आहेत. ही निवडणूक सुध्दा या मुखवट्यांभोवती फिरत आहे. रिंगणात जरी उमेदवार असले तरी या मागे असलेल्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.निवडणूक म्हटले की पहिल्या दिवसांपासून त्याचे योग्य व्यवस्थापन करावे लागते. निवडणुकी दरम्यान मिळलेल्या कमी दिवसांचे योग्य व्यवस्थापन करण्यात जो बाजी मारतो तो खºया अर्थाने सिंकदर ठरतो. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुध्दा यंदा उमेदवारांपेक्षा त्यामागे असलेल्या दिग्गजांभोवती केंद्रीत आहे. यंदा निवडणुकीच्या रिंगणात खा. प्रफुल्ल पटेल नसेल तरी प्रत्यक्षात ही निवडणूक तेच लढवित असल्याचे चित्र आहे. महाआघाडीच्या उमेदवारच्या प्रचारार्थ ते स्वत: आणि वर्षा पटेल हे दिवसरात्र एक करुन संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढीत आहेत. त्यांच्या सोबतीला खा. मधुकर कुकडे, माजी आ.राजेंद्र जैन, आ.गोपालदास अग्रवाल आणि दोन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख नेते हे सुध्दा मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत पोहचून प्रचार करीत आहे. मतदारसंघातील चित्रावरुन प्रफुल्ल पटेल हे स्वत: जरी उमेदवार नसले तरी त्यांनी ही निवडणूक स्वत:च रिंगणात असल्यासारखी मनावर घेतली आहे. त्यामुळेच ते उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. तर युतीचे सुध्दा यंदा हे तंत्र आहे. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. डॉ. परिणय फुके, पालकमंत्री राजकुमार बडोले, आ. अनिल सोले व भाजपचे विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर यांच्या हाती निवडणूक व्यवस्थापनाची सूत्रे आहेत.शिवाय युतीचा उमेदवार यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविला असून त्यांनी या मतदारसंघाची निवडणूक फार मनावर घेतली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांचे विश्वासू समजले जाणारे फुके हे मागील पंधरा दिवसांपासून या मतदारसंघात तळ ठोकून आहे. निवडणूक व्यवस्थापनाची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली आहे. तर बावनकुळे, बडोले, सोले आणि कोठेकर या दिग्गजांच्या अनुभवाने ते मतदारसंघात चक्रव्यूह रचत आहेत. युतीतर्फे सुनील मेंढे हे निवडणूक लढवित असले तरी प्रत्यक्षात परिणय फुके हेच मैदानात असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यामुळेच उमेदवारांच्या चेहऱ्यांमागील मुखवटे वेगळेच असून या दिग्गजांची खºया अर्थाने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर या मतदार संघातील हेवी वेट निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्टÑाचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019