लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्रीय निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले असून निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज झालेलं आहे. कोणत्याही निवडणुकीत महत्त्वाची असतं ती म्हणजे मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावरची निळी शाई. तुम्हाला माहिती आहे का? या बोटावरच्या शाईची किंमत कोट्यवधी रु पयांमध्ये जाते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शाईच्या २६ लाख बाटल्यांची आॅर्डर दिली आहे.देशभरात ९० कोटी मतदार संख्या असून त्यासाठी लागणाऱ्या निळ्या शाईच्या २६ लाख बाटल्या मागविण्यात आल्या आहेत. याची किंमत जवळपास ३३ कोटी रु पये आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला ११ एप्रिलपासून सुरु वात होतेय, ७ टप्प्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार असून १९ मे रोजी अंतिम मतदानाचा टप्पा पार पडणार आहे. २३ मे रोजी मतदान मोजणी करण्यात येणार आहे. २००९ च्या निवडणुकीची तुलना करता यंदा निळ्या शाईच्या किंमतीत तीनपट वाढ झाली आहे. २००९ मध्ये निळ्या शाईची किंमत १२ कोटी रु पये होती. तर मागील २०१४ च्या निवडणुकीपेक्षा यंदा साडेचार लाख बाटल्या अधिक मागविण्यात आल्या आहेत.एका बाटलीमध्ये १० मिली निळी शाई असते. एका बाटलीमधून किमान ३५० मतदारांवर निळ्या शाईचं निशाण लावू शकतो. २००४ च्या निवडणुकीवेळी मतदान करणाऱ्या मतदाराच्या बोटावर केवळ एक ठिपका निळ्या शाईचा लावण्यात येत होता. मात्र २००६ रोजी निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी सरळ रेषा आखण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शाईचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बाटल्या देण्यात येतात. सर्वांत जास्त बाटल्यांचा वापर उत्तर प्रदेशात केला जातो.याठिकाणी ३ लाख बाटल्यांचा वापर करण्यात येतो. तर सर्वांत कमी बाटल्या लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात वापरण्यात येतात. याठिकाणी २०० बाटल्यांचा वापर होतो. मतदानापूर्वी मतदान केंद्रावर हाताच्या बोटावर लावली जाणारी शाई ही म्हैसूरवरून संपूर्ण देशात पाठवली जाते. सर्वप्रथम १९६२ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शाईचा वापर करण्यात आला. यानंतर देशात होणाºया प्रत्येक निवडणुकीत शाईचा वापर होऊ लागला.म्हैसूरवरून येणार शाईया वेळी देशातील काही भागात बोगस मतदान होत असल्याच्या घटना घडत होत्या. या घटना थांबवण्यासाठी या पद्धतीचा उपयोग करण्यात आला. म्हैसूरची शाई ही निळी शाई बोटावर लावल्यानंतर अजिबात पुसता येत नाही. ही शाई म्हैसूर येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये तयार होते.या कंपनीकडून जगातील २५ देशांना निवडणुकीची शाई दिली जाते. आपल्या देशालाही निवडणुकीसाठी शाईचा पुरवठा करण्याचे कंत्राट याच कंपनीला देण्यात येते. म्हणूनच निवडणुकीत वापरल्या जाणाºया या शाईला ‘म्हैसूरची शाई’ म्हणून ओळखली जाते.
Lok Sabha Election 2019; मतदारांचे मत अमूल्य,पण बोटावरची शाई कोट्यवधींची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:12 PM
केंद्रीय निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले असून निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज झालेलं आहे. कोणत्याही निवडणुकीत महत्त्वाची असतं ती म्हणजे मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावरची निळी शाई. तुम्हाला माहिती आहे का? या बोटावरच्या शाईची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये जाते.
ठळक मुद्देअसा आहे शाईचा इतिहास : किमतीत झाली वाढ