शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

सांगलीत गणेश मंडळांची देखावे उभारण्यासाठी लगबग...

By admin | Published: August 02, 2016 12:10 AM

गणेशोत्सव महिन्यावर : गणरायाला साकारण्यात शहरातील मूर्तीकार मग्न; मूर्तींच्या किंमतीत यंदा २५ ते ३0 टक्के वाढ होणार--बाप्पा मोरयाऽऽ

दोन संशयित ताब्यात : अनैतिक संबंधातील काटा दूर करण्यासाठी जंगलात नेऊन मारले? बोंडगावदेवी : दोन दिवसांपूर्वी गोरेगाव तालुक्यातील जांभळीच्या जंगलात सापडलेल्या अज्ञात युवकाच्या मृतदेहाने खळबळ उडाली होती. त्या युवकाच्या अंगावरील जखमा पाहून त्याची हत्या झाल्याचा निष्कर्श काढून पोलिसांनी तपास सुरू केला होता. दरम्यान त्याची ओळख पटली असून तो अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिलेझरी निलेश उर्फ देवानंद गोपाल गोपे (३२) असल्याचे स्पष्ट झाले. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानेच त्याची हत्या झाल्याची चर्चा गावात सुरू आहे. दरम्यान दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. याप्रकरणी बोंडगावदेवी येथील सचिन बोरकर व देवलगाव येथील देवेंद्र शिवणकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राप्त माहितीनुसार, रविवारी (दि.३१) जांभळीच्या जंगलात अज्ञात युवकाचा खून झाल्याचे उघडकीस आले. ही बातमी सोमवारच्या अंकात प्रकाशित वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित होताच सिलेझरी येथील बेपत्ता असलेल्या देवानंदला शोधण्यासाठी त्याच्या घरचे लोक व गावातील नागरिक गोरेगाव येथे गेले. मृतदेहाची ओळख पटवत त्यांनी तो देवानंदच असल्याचे नातलगांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर दुपारी त्याचा मृतदेह सिलेझरी येथील त्याच्या राहत्या घरी आणण्यात आला. सिलेझरी येथील देवानंद गोपे हा पत्नी, आई व तीन महिन्याच्या मुलीसोबत राहतो. शनिवारला (दि.३०) चुलत भाऊ कामेश नामदेव गोपे (२३) याच्यासोबत भाजीपाला आणण्यासाठी देवानंद सानगडीला गेला होता. सायंकाळच्या सुमारास बोंडगावदेवीचा सचिव बोरकर व देवलगाव येथील देवेंद्र शिवणकर याच्यासोबत तो मोटारसायकलने सागनडीच्या बसस्टॉपवर आला. त्यानंतर सचिन बोरकरने आपल्या मोटारसायकलवर त्याला बसवून नेल्याचे प्रत्यक्षदर्शी देवानंदचा भाऊ कामेश याने पोलिसांना सांगितले. सचिनसोबत गेल्यापासून तो गायब झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. घरच्या लोकांनी नातलगाकडे विचारपूस केली, परंतु ठावठिकाणा लागला नाही. अखेर तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (दि.१) वर्तमानपत्राच्या माध्यमातून जांभळीच्या जंगलात एका युवकाचा खून झाल्याची बातमी कळताच गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली. या खुनातील प्रमुख सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात असल्याने देवानंदच्या खुनाचे रहस्य उलगडण्यासाठी पोलिसांना महत्वपूर्ण धागा गवसला आहे. यात सहभागी असणाऱ्यांचा शोध लावावा, अशी गावकऱ्यांची एकमुखी मागणी आहे. (वार्ताहर) धारदार शस्त्राने मारले तिल्ली-मोहगाव ते जांभळीकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याच्या जंगल शिवारात देवानंदच्या गळ्यावर, कानावर, गालावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जिवानिशी ठार करण्यात आले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात फेकून दिला. पोलीस पाटील राजेंद्र धमगाये रा.तिल्ली-मोहगाव यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश कदम करीत आहेत. - खुनाच्या षडयंत्रात पत्नीही? खुनाच्या षडयंत्रामध्ये बोंडगावदेवी येथील सचिन शालीकराम बोरकर, पिंपळगाव/खांबी येथील देवेंद्र शिवणकर, देवानंदची पत्नी सुषमा, साळा सचिन सोनवाने, सासू बोळदे निवासी यांचा सहभाग असल्याचा आरोप मृतक देवानंद गोपेच्या नातेवाईकांना गोरेगाव पोलिसांकडे केला आहे. होतकरू कुटंूबात एकुलता एक असणाऱ्या देवानंदच्या मारेकऱ्यांना गावात आणा, तेव्हाच प्रेत उचलण्यात येईल, असा आक्रोश नातलग व गावकऱ्यांनी केला. ४बोंडगावदेवीच्या सचिन बोरकरला अटक करा अशी मागणी गावकऱ्यांनी अर्जुनी-मोरगावचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्याकडे केली. सचिनला अटक करून गोरेगावला नेले असे सांगितल्यावरही ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम राहिले. अखेर ठाणेदार बंडगर यांनी गोरेगाव ठाणेदारांशी संपर्क साधून भ्रमणध्वनीवरून सचिन बोरकर आमच्या ताब्यात आहे, असे गोरेगाव पोलिसांनी सांगितल्यावरच प्रेत अंतिम संस्कारासाठी ग्रामस्थांनी स्मशानभूमीत नेले. यावेळी गावात पोलिसांनी चोख बंदोबस्त होता. वर्षभरापूर्वी झाले होते लग्न सिलेझरी येथील देवानंदचे लग्न वडसा तालुक्यातील बोळद येथील दादाजी सोनवाने यांची मुलगी सुषमा हिच्याशी २६ एप्रिल २०१५ रोजी झाले होता. लग्नानंतर काही दिवस खटके उडाले, असे गावात सांगितल्या जाते. देवानंदला एक तीन-चार महिन्याची मुलगी आहे. सुषमाचे आई-वडील विटा बनविण्यासाठी बोंडगावदेवी येथील सचिन बोरकर यांच्या घरी मागील काही वर्षापासून येत होते. ती पण आई-वडीलासोबत वीटा बनविण्यासाठी यायची अशी माहिती मिळाली. तेव्हापासून आरोपी सचिनशी तिची ओळख होती, अशी चर्चा सिलेझरी गावात आहे.