लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया -चंद्रपूर रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणात दारुची तस्करी केली जाते. या तस्करीसाठी महिलांचा वापर केला जात असल्याची बाब सुध्दा उघडकीस आली आहे. रेल्वे गाड्यांमधून होणाऱ्या दारु तस्करीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय यांनी दिली.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे रेल्वे सुरक्षा बल मंडळ नागपूरचे सुरक्षा आयुक्त पांडेय हे रविवारी (दि.११) गोंदिया येथे आले होते.या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना ते बोलत होते. पांडेय म्हणाले, रेल्वे सुरक्षा बलाचे जवान या दारुच्या तस्करीवर करडी नजर ठेवणार आहे. रेल्वेमधून अवैध वेंडर प्रवास करीत असून त्यांच्यावर कारवाईची मोहीम शिथील झाल्यामुळे याचा त्रास प्रवाशांना होत आहे.रेल्वेमध्ये तृतीयपंथीयाकडून प्रवाशांना होणारा त्रास होत आहे. मुख्य रेल्वे स्थानकावरुन वेंडर व तृतीयपंथीय गाडीत चढत नसून छोट्या स्टेशनवरुन ते गाडीत प्रवेश करतात व मोठे स्टेशन येण्याच्या पूर्वीच उतरतात. या प्रकारवर पूर्णपणे आळा घालण्यात येईल असे पांडेय यांनी सांगितले.पार्किंग व्यवस्था बिघडलीगोंदिया रेल्वे स्थानकाच्या दक्षिण भागातील पार्कीग व्यवस्था बिघडली असल्याचे मंडळ सुरक्षा आयुक्तांनी या वेळी मान्य केले.खाजगी व्यक्तींना वाहन ठेवण्याचे कंत्राट दिल्यामुळे त्याच्याकडून वाहन रस्त्यावर ठेवले जात असल्याने प्रवाशांना गाडी पकडता येत नाही. गोंदियाच्या रेल्वे कॉलोनीत होणाºया चोºया गंभीर असल्याचे त्यांनी मान्य केले.महिला मित्रांनी दाखल केली ४०० प्रकरणेनागपूर ते कामठी दरम्यान कार्यरत असलेल्य तेजस्वीनी ग्रुपची माहिती मंडळ सुरक्षा आयुक्तांनी दिली. गोंदिया ते नागपूर दरम्यान ३५ महिलांची एक चमू तयार करण्यात आली. या महिलांना महिला मित्र असे नाव देण्यात आले. या महिला गाडीच्या डब्ब्यामध्ये होणाऱ्या असामाजिक घटनावर करडी नजर ठेवून याची माहिती रेल्वे विभागाला देते. त्याच्या सहकार्याने मार्चपासून आतापर्यंत ४०० प्रकरणे दाखल करण्यात आली. यात काही तिकीट निरीक्षक, महिला पोलीस व अपडाऊन करणाºया महिलांचा समावेश आहे.
रेल्वेतून होणाऱ्या दारू तस्करीवर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 10:01 PM
गोंदिया -चंद्रपूर रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणात दारुची तस्करी केली जाते. या तस्करीसाठी महिलांचा वापर केला जात असल्याची बाब सुध्दा उघडकीस आली आहे.
ठळक मुद्देमंडळ सुरक्षा आयुक्त पांडेय यांची माहिती : विशेष मोहीम राबविणार