लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय जिल्ह्यात एकमेव शासकीय महिला रुग्णालय आहे. या रुग्णालयात महिन्याकाठी सुमारे ६०० महिलांची प्रसुती केली जाते. या प्रसुतीसाठी गोरगरीब रुग्णांचे नातेवाईक येत असल्याने त्यांना धमकावून लुटमार करण्याच्या घटना रात्रीच्यावेळी घडत असतात. मागील काही दिवसांपासून पुन्हा गंगाबाई स्त्री रुग्णालयात असामाजिक तत्त्वांचा शिरकाव होऊ लागला आहे. यामुळे मात्र येथे वावरणाºया रूग्णांच्या नातेवाईकांत दहशतीचे वातावरण आहे.दोन वर्षापूर्वी गंगाबाई स्त्री रुग्णालयात असेच असामाजिक तत्त्व वावरत होते. त्यामुळे रात्रीच्यावेळी प्रसुतीसाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना धमकावून, चमकावून लुटणे व मारहाण करणे या घटना पुढे आल्या होत्या. त्यानंतर ‘लोकमत’ने वारंवार बातम्या प्रकाशित करून या रुग्णालयात पोलीस चौकी देण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात पोलिस चौकी देण्यात आली.दर ८ तासांसाठी एक पोलीस कर्मचारी या ठिकाणी नियुक्त केला जातो. परंतु रात्रीच्या वेळी राहणारे पोलिस कर्मचारी गंगाबाई परिसरात गस्त न घालता आपल्या खोलीत झोपा काढत असल्याने असामाजिक तत्वांचे येथे फावते. परिणामी मारहाण व लुटपाटच्या लागोपाठ घटना घडत असतात.दोन वर्षापूर्वी चुटीया येथील मोहीनी शरणागत या तीन वर्षाच्या मुलीला पळविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तीन ते चार अज्ञात इसमांनी गंगाबाई येथे असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकाला चाकू दाखवून धमकाविले होते. तीन ते चार अज्ञात इसम चोरी करण्याच्या उद्देशाने धर्मशाळेत वावरत असताना गंगाबाई तर्फे ठेवण्यात आलेल्या सुरक्षा सेवकांनी त्या इसमांना हटकले. त्यावर त्या सुरक्षा रक्षकांशी त्या इसमांचा वाद झाला होता.सुरक्षा सेवक धर्मशाळेत येण्यापूर्वी धर्मशाळेतील एका व्यक्तीचा मोबाईल चोरी गेल्याचे लक्षात आले. सदर इसम १५ ते २० मिनिटाने रुग्णालयाच्या बाहेर पडले. सुरक्षकाला चाकूचा धाक धमकाविल्यामुळे रुग्णालयात काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र यावेळी पोलीस चौकीतील कोणताही पोलीस त्या ठिकाणी आला नव्हता. अशा विविध घटना रूग्णालयात घडलेल्या आहेत.यापूर्वी गोंदिया शहर पोलिसांची चमू रात्रीच्यावेळी गस्त घालायची. त्यामुळे असामाजिक तत्व वावरत नव्हते. मात्र पोलिसांची पेट्रोलिंग बंद झाल्याने तसेच गंगाबाईच्या परिसराला लागून पानटपरी, चहाटपरी व पडक्या शासकीय इमारतीचा आधार घेवून रात्रीच्यावेळी हे असामाजिक तत्त्व गंगाबाईतील रुग्णांच्या नातेवाईकांना लुटण्याचा किंवा त्यांना हानी पोहोचविण्याचा प्रयत्न करतात.या प्रकारांवर अंकुश लागावे यासाठी पोलिसांनी रूग्णालयात करडी नजर ठेवणे गरजेचे असून तशी मागणी रूग्णांचे नातेवाईक करीत आहेत.चौकी नावापुरतीगंगाबाईत असामाजिक तत्वांचा शिरकाव होण्याला पोलीस कारणीभूत आहेत. नागरिकांची ओरड झाल्यावर पोलीस चौकी उघडण्यात आली. मात्र येथे दररोज रात्रीच्या पाळीत पाहिजे तेवढ्या मनुष्यबळाची नियुक्ती केली नाही. एका निशस्त्र पोलीस कर्मचाºयाच्या खांद्यावर एवढ्या मोठ्या गंगाबाई रुग्णालयाची धूरा असते. त्यामुळे तो कर्मचारीही रात्री गस्त न घालता आपल्या चौकीत आराम करतो. गंगाबाईत पोलीस चौकी आहे परंतु पोलिसांना न जुमानणारे समाजकंटक रात्रीच्यावेळी या ठिकाणी वावरत असतात. येथे असलेली चौकी फक्त नावापुरती असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गंगाबाई रुग्णालयात लूटमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:18 AM
येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय जिल्ह्यात एकमेव शासकीय महिला रुग्णालय आहे. या रुग्णालयात महिन्याकाठी सुमारे ६०० महिलांची प्रसुती केली जाते.
ठळक मुद्देअसामाजिक तत्त्वांचा शिरकाव : रुग्णांच्या नातेवाईकांना मारहाण