लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश दिले आहे. अन्यथा त्यांचा घरभाडे भत्ता कपात करण्याची तरतूद केली आहे. मात्र येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी या नियमाचे सर्रासपणे उल्लघंन करीत आहे. कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांची कामे होत नसल्याचे चित्र आहे.येथील कृषी मंडळ कार्यालयात नवीन मंडळ कृषी अधिकारी रुजू झाले आहेत. दोन कृषी पर्यवेक्षक तसेच १२ कृषी सहायक आणि १ शिपाई असा एकूण १६ कर्मचाºयांचा स्टाफ आहे. या कार्यालयातील कर्मचारी मुख्यालयात राहत नाहीत. केवळ १ कृषी सहायक व १ शिपाई मुख्यालयात राहतात. बाकी कर्मचारी दूरवरुन अपडाऊन करतात.कर्मचारी शासकीय वेळेत कार्यालयात राहत नसल्याने कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना आल्या पावलीच परत जावे लागते. हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुद्धा दुर्लक्ष झाले आहे. एखाद्या शेतकऱ्यानी मोबाईलवरुन विचारपूस केल्यास मी दौऱ्यावर आहे असे उत्तरे कर्मचारी देतात.शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहे. मात्र येथील कर्मचाऱ्यांच्या अपडाऊन संस्कृतीमुळे त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपूर्वी घोगरा गावासाठी २५ बॅग हरभरा शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी आला होता. पण येथील कृषी सहायकांनी आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना त्याचे वाटप केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
कर्मचाऱ्यांचा मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 9:33 PM
शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश दिले आहे. अन्यथा त्यांचा घरभाडे भत्ता कपात करण्याची तरतूद केली आहे. मात्र येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी या नियमाचे सर्रासपणे उल्लघंन करीत आहे. कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांची कामे होत नसल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देमंडळ कृषी अधिकारी कार्यालय : वरिष्ठांचे दुुर्लक्ष