लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जनावरे एकमेकाच्या संपर्कात आले की त्यांना लंपी स्कीन डिसीज होतो. जनावरांच्या शरीरावर गाठी येतात आणि त्या गाठीतून पस तयार होऊन त्याची इतर जनावरांना लागण होण्याचा धोका असतो. हा आजार गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळून आला आहे. सालेकसा तालुक्याच्या धानोली येथील तब्बल १५१ जनावरांना या आजाराची लागण झाली असल्याचे पुढे आले आहे. त्या जनावरांवर पशूसंवर्धन विभागाने उपचारही केले आहे.एका जनावराच्या संपर्कात आलेल्या जनावरांना होणारा संसर्गजन्य आजार म्हणजे लंपी स्कीन आजार आहे. सालेकसा तालुक्यातील धानोली येथील जनावरांना हा आजार असल्याचे पुढे आल्याने कावराबांध येथील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना माहिती दिली. जि.प.मुख्य कार्यकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मागदर्शनात एक चमू गठित करून त्या चमूला धानोली येथे पाठविण्यात आले. त्या चमूमध्ये जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक, जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त डॉ.गायगवळी, सहाय्यक आयुक्त डॉ. गेडाम होते. १६ तारखेला धानोली येथे पोहचलेल्या चमूने दुपारपासून रात्रीपर्यंत जनावरांची तपासणी मोहीम राबविली. गावातील संपूर्ण ४०० जनावरांची पाहणी केली. त्यात १५१ जनावरांना हा आजार असल्याचे लक्षात आले. एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांपर्यंत पोहचणारा हा पहिल्यांदाच आजार आपल्या जिल्ह्यात आढळला आहे. या आजाराच्या बचावासाठी दर आठ दिवसाने गोचीड, गोमासे यांचा विनाश करणारे सायफर मेथरीनची फवारणी, ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.जनावरे एकामेकाला स्पर्श करतील अशा स्थितीत त्या जनावरांना बांधायचे नाही, एकाच कुंडावर पाणी पिण्यासाठी त्या जनावरांना बांधू नये अश्या सूचना देण्यात आल्या. हा आजार संसर्गजन्य (संपर्कात आल्याने होणारा रोग) असल्याने जनावरांचेही शारीरीक अंतर ठेवणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जनावरांना गाठी येणे, त्या गाठीतून पस तयार होणे, ते पस बाहेर येते पुन्हा त्या पसमधून निघालेले विषाणू पसरतात आणि इतर जनावरांना याची लागन होते. ताप येत नाही किंवा जनावरांचा मृत्यू होत नाही. यासाठी पशूपालकांनी जनावरांकडे लक्ष देण्याची गरज आहे.जिल्ह्यात अलर्टलंपी स्कीन डिसीज जिल्ह्यात पसरू नये यासाठी पशूसंवर्धन विभागाने आपल्या यंत्रणेला सूचना दिल्या. आजार झाल्यास वेळीच उपचार करायचा, त्या जनावरांचा उपचार कसा करायचा ही प्रणाली सांगितली आहे. पशूपालकांनी याकडे लक्ष द्यावे, वेळीच पशूसंवर्धन विभागाला माहिती द्यावी.एका जनावपासून दुसºया जनावरांना होणारा हा संसर्गजन्य आजार असल्याने जनावरांना खुंटावर जवळ-जवळ बांधू नये, एकाच ठिकाणी चारा देऊ नये, तळ्यात जनावरांना सामूहिक पाणी पाजू नये.दर आठवड्याला गोठ्यात फवारणी करावी.-डॉ. राजेश वासनिक, जिल्हा पशू संवर्धन अधिकारी जि.प. गोंदिया
गोंदिया जिल्ह्यातील १५१ जनावरांना विषाणूजन्य आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 2:00 PM
जनावरे एकमेकाच्या संपर्कात आले की त्यांना लंपी स्कीन डिसीज होतो. जनावरांच्या शरीरावर गाठी येतात आणि त्या गाठीतून पस तयार होऊन त्याची इतर जनावरांना लागण होण्याचा धोका असतो. हा आजार गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळून आला आहे.
ठळक मुद्दे धानोली येथील जनावरांना लागण