शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

फेसबुकवर मैत्री जमली, शेअर मार्केटमध्ये १८ लाखांना फसवले

By नरेश रहिले | Published: November 19, 2023 4:34 PM

दोन वर्षांपासून सुरू होता व्यवहार, फेसबुकवरील दोस्ती महागात पडली

गोंदिया : फेसबुकवर झालेल्या दोस्तीतून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याचा नाद केला आणि तब्बल १८ लाख १९ हजार ४४ रूपये गमावून बसणाऱ्या मेकॅनिकल इंजिनियरने हतबल होऊन तिरोडा पोलिसात शनिवारी (दि.१८) तक्रार केली. त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून नफा कमवून देण्याच्या नावावर दोन वर्षांपासून दाेस्ती करणाऱ्या व्यक्तीने गंडविले आहे. वर्धनराज एस (रा. अशोकनगर, चेन्नई) असे आरोपीचे नाव आहे.तिरोडा तालुक्यातील ग्राम ठाणेगाव येथील फेकचंद नकटू पटले (३७) हा तरूण ओमान या देशात मागील १४ वर्षांपासून मेकॅनिकल इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. फेकचंद पटले ओमान देशातून आपल्या गावी ठाणेगाव येतात व सुटी संपल्यानतर परत कामावर ओमान येथे जातात. ओमान येथे असताना फेसबुकचा वापर करीत असून वर्धराजन याची निफ्टी बॅकनिफ्टी पोस्ट बघायचे. त्यानुसार २९ नोव्हेंबर २०२१ मध्ये पटले याने वर्धराजन याला फेसबुकवर संदेश पाठविले व वर्धराजन यांच्याशी व्हॉट्सॲपवर सगळी माहिती विचारली.

वर्धराजनने तुम्ही मला आपले डीमॅट अकाउंट वापरु दिल्यास तुम्हाला स्टॉक मार्केट मध्ये भरपूर फायदा करुन देऊ शकतो असे आमिष दिले. तसेच जो लाभ होईल त्यातील १० टक्के रक्कम वर्धराजन यांच्या अकाऊंटवर टाकण्याचे तसेच जर कॅपिटल अमाऊंटचे नुकसान झाले तर तो अमाऊंट रिकव्हर झाल्यावर होणाऱ्या नफ्याचे ३० टक्के वर्धराजन यांना देण्याचे दोघांत ठरले. फेकचंद पटले यांना नफा मिळवून देण्याचे आमिष देत वर्धराजन याने त्याची तब्बल १८ लाख १९ हजार ४४ रूपयांनी फसवणूक केली. या घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक दलालवाड यांनी करीत आहेत.डिमॅट अकाऊंटचे अधिकार आरोपीला दिले होतेठाणेगाव येथील फेकचंद पटले याला आरोपी वर्धराजन याने तुमचे डिमॅट अकाऊंटचे अधिकार द्या नफा मिळवून देतो असे म्हटले होते. यावर पटले याने झेरोधा डिमॅट अकाऊंटचे सगळे अधिकार त्याला दिले. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी १९९९ रूपये भरून फेकचंद पटले यांनी त्याच्या कंपनीत सदस्यत्व मिळवून पटले वर्धराजन याला युजर अकांऊट, पासवर्ड, पीननंबर व्हॉटसॲपवर पाठविले होते.१७.७७ लाखाचे नुकसान असताना स्टेटस ५.४५ लाख नफ्याचावर्धराजन याने २ डिसेंबर २०२१ रोजी झेरोधा डिमॅट अकाऊंटवरून १७ लाख ९९ हजार ६१५ रूपयांची ट्रेडिंग केली. त्या दिवशी वर्धराजन १७ लाख ७७ हजार ७४४ रूपयांनी तोट्यात गेला. परंतु त्याचवेळी वर्धराजनने पाच लाख ४५ हजार ७०४ रूपये नफा झाल्याचा स्टेटस ठेवला होता. त्या स्टेटसचा स्क्रीन शॉट घेऊन वर्धराजनला पाठविले व त्याला या संदर्भात पटले यांनी विचारपूस केली. त्यावर मी ऑफिसमध्ये नव्हतो. ऑफिसच्या मुलाला नेफ्टी सीई बाय करायला सांगितले होते. पण त्याने नेफ्टी पे बाय केल्याचे सांगत नुकसान झाल्याचे म्हटले.म्हणे महिनाभरात रिकव्हरी करून देतोझालेले नुकसान भरून काढणार नाही तेव्हापर्यंत ३० टक्के घेणार नाही असे राजवर्धन म्हणाला. ३ डिसेंबर २०२१ ला वर्धराजन याने फेकचंद पटले याच्या झेरोधा डिमॅट अकाऊंटमध्ये असलेल्या २१ हजार ८७० रुपयांची ट्रेडिंग करुन २३ हजार ९७१ रुपयांचा नफा केला. झालेल्या नफ्यातून ३० टक्के रकमेची मागणी केली नाही. पटले यांना फोन करून दोन आठवडे ते एक महिन्यात तुमचे नुकसान रिकव्हर करून देण्याची हमी दिली.फेसबुक आणि व्हॉट्सॲप केले ब्लॉक केलेपटले यांची तोट्यात असलेली रक्कम रिकव्हर करण्यासंदर्भात वर्धराजनला म्हटले असता त्याने कॅपिटल अमाऊंट रिकव्हर करून देण्यास नकार दिला. पटले यांना वर्धराजन वारंवार आमिष देऊन त्याची १८ लाख १९ हजार ४४ रूपयांनी फसवणूक केली. एवढेच नाही तर फेकचंद पटले याचा व्हॉट्सॲप व फेसबुकला आरोपीने ब्लॉक केले आहे.

टॅग्स :share marketशेअर बाजार