शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

"मोठी डील झालीय"; तिकीट कापल्यानंतर चंद्रिकापुरेंचे थेट पत्र; म्हणाले, "अजित पवारांनी खंजीर खुपसला"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 12:41 PM

Manohar Chandrikapure : अजित पवार यांनी विश्वासघात केल्याचे म्हणत मनोहर चंद्रिकापुरे यांनी एक पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली

Arjuni Morgaon Assembly Constituency : भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या माजी मंत्री राजकुमार बडोलेंना अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी उमेदवारी दिली आहे. बडोलेंना उमेदवारी देताना अजित पवार यांनी विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे तिकीट कापले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मनोहर चंद्रिकापुरे यांनी थेट अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांनी विश्वासघात केल्याचे म्हणत मनोहर चंद्रिकापुरे यांनी एक पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. यानंतर आता चंद्रिकापुरेंनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चंद्रिकापुरे हे काँग्रेसमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरु झालीय.

भाजपचे नेते आणि राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना विद्यमान आमदार चंद्रिकापुरे यांच्या जागी उमेदवारी जाहीर करण्यात आली.  दोन पक्षांतील सहमतीने बडोलेंनी अजित पवार गटात प्रवेश करून उमेदवारी पक्की केली. त्यामुळे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा पत्ता कट करण्यात आला. बडोलेंचा मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे चंद्रिकापुरे यांनी पराभव केला होता. मात्र, त्यांच्याबाबत मतदारसंघात असलेली नाराजी पाहता अजित पवार यांनी चंद्रिकापुरे यांना उमेदवारीस नकार दिला.

उमेदवारी न मिळाल्यानंतर मनोहर चंद्रिकापुरे यांनी एक पत्र लिहून अजित पवार यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला आहे. इच्छा नसतानाही  मी आणि माझा मतदारसंघ तुमच्यासोबत राहिला, पण तुम्ही माझा विश्वासघात केला म्हणत मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पाठीत खंजीर खुपसणाऱ्या अजितदादा पवार व प्रफुल्लभाई पटेल यांना थेट पत्र म्हणत मनोहर चंद्रिकापुरेंनी ही पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. दुसरीकडे, मनोहर चंद्रिकापुरे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते काँग्रेसमधून उभे राहण्याची शक्यता आहे.

मनोहर चंद्रिकापुरेंचे पत्र  "दादा हा 'विश्वासघात' जनतेला 'पटेल'च असं नाही! नमस्कार, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निष्ठावंत व एकनिष्ठ कार्यकर्ता बोलतोय. आज माझं तिकीट कापण्यात आल्याचं समजल. मुंबईत येऊनही रिकाम्या हाताने परत यावं लागलं याचं मनापासून दुःख झालंय. दादा, जेव्हा महायुतीत जाण्याचा निर्णय तुम्ही घेतला तेव्हा इच्छा नसतानाही आपल्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेऊन मी आणि माझा मतदारसंघ तुमच्यासोबत राहिला. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, पण तुम्ही माझा विश्वासघात केला. केवळ, माझाच नाही तर माझ्यासह माझ्या अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील लाखो नागरिकांचा हा विश्वासघात आहे. मीच राष्ट्रवादीचा उमेदवार असेन, असं सांगत मी मतदारसंघातील गावं न गावं पिंजून काढली, येथील जनतेला भेटून आपली भूमिका कशी बरोबर आहे, हे समजावलं. पण, ऐनवेळी माझ्याच पाठीत खंजीर खुपसला. दादा, पाठीत खंजीर खुपसल्याचे वाईट वाटते हो, पण ज्या हातात खंजीर आहे, तो हात आपलाच असल्यावर जास्त वाईट वाटते. दोन दिवसांपूर्वी भाजपचा नेता प्रफुल भाई पटेल यांना भेटला आणि त्यांना पटलं. हे सहजच पटेल असं नक्कीच वाटत नाही, यात मोठी डील झालीय अशीच चर्चा आता मतदारसंघात, जनतेत सुरू आहे. कालपर्यंत मी भाजपचा निष्ठावंत, कट्टर म्हणणार नेता आज सुमडीत आपल्या पक्षात आला, दादा, नेतेमंडळी पक्ष बदलायला मोकळी असते, पण सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता एकनिष्ठतेची अग्निपरीक्षा देत असतो. म्हणूनच, आमच्या इथल्या नेत्याची सख्यासारखी बदललेली भूमिका पाहून वाईट वाटलं. मला आणि माझ्या मतदारसंघातील जनतेलासुद्धा. उद्याच आजसुद्धा मला माहिती नाही, पण मतदारसंघातील जनता हे विसरणार नाही, हा विश्वासघातकीपणा लक्षात ठेवेल, तुम्हाला कदाचित हे पटलं असेल, पण माझ्या लोकांना हे अजिबात 'पटेल' असं नाही. त्यामुळेच याच निवडणुकीत याचा हिशोब होणार आणि जनताच सुफडासाफ करणार. कारण, आता मी जनतेमध्ये जाऊनच दाद मागणार आहे, आता जनतेलाच विधानसभेचं तिकीट मागणार आहे," असे मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४arjuni-morgaon-acअर्जुनी मोरगावAjit Pawarअजित पवार