लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रात मागील पंधरा वर्षांत झालेल्या विकास कामांमुळे मोठा बदल झाला आहे. आ.गोपालदास अग्रवाल यांनी या मुंबईत आपले राजकीय वजन वापरुन कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे कोणत्या मतदार संघात झाली असतील तर ती गोंदिया विधानसभा मतदारसंघात झाली आहे. गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्त्वातच या मतदारसंघाचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले भाजी विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णकुमार लिल्हारे यांनी केले.गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ शहरात ठिकठिकाणी पदयात्रा व प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, शहरध्यक्ष सुनील केलनका, छत्रपाल तुरकर,रमेश अंबुले, घनश्याम पानतवने, शकील मन्सुरी, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, संजय कुलकर्णी,नेत्रदीप गावंडे, नंदू बिसेन, दिनेश दादरीवाल, धनलाल ठाकरे उपस्थित होते. लिल्हारे म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचा विस्तार केला. तसेच हेल्थ वेलनेस योजनेत एकमेव गोंदिया तालुक्याचा समावेश केला.शासकीय विभागाची कार्यालये ठिकठिकाणी असल्याने नागरिकांना विविध कामांसाठी इतरत्र पायपीट करावी लागत होती. ती दूर करण्यासाठी प्रशासकीय इमारतीची निर्मिती करुन ३२ शासकीय विभागाच्या कार्यालयाचा कारभार एकाच इमारतीतून सुरू केला. यामुळे नागरिकांना विविध कामासाठी करावी लागणार पायपीट सुध्दा कमी झाली. मुंबईच्या धर्तीवर गोंदिया शहरात भाजी आणि फळबाजाराचा विकास करण्याचे काम त्यांच्याच माध्यमातून झाले. शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या दूर करण्यासाठी नवेगाव काटी उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळवून आणली. यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाशी दोन हात करणे शक्य होणार आहे.एकंदरीत अनेक विकास कामे ही गोपालदास अग्रवाल यांच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा सभेला संबोधित केले.
Maharashtra Election 2019 ; गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात विकास शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 6:00 AM
शासकीय विभागाची कार्यालये ठिकठिकाणी असल्याने नागरिकांना विविध कामांसाठी इतरत्र पायपीट करावी लागत होती. ती दूर करण्यासाठी प्रशासकीय इमारतीची निर्मिती करुन ३२ शासकीय विभागाच्या कार्यालयाचा कारभार एकाच इमारतीतून सुरू केला. यामुळे नागरिकांना विविध कामासाठी करावी लागणार पायपीट सुध्दा कमी झाली.
ठळक मुद्देकृष्णकुमार लिल्हारे : गोंदिया येथे प्रचारसभा