लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून सुरवातीच्या दोन फेऱ्यात महाविकास आघाडीकडे कल असल्याचे स्पष्ट झाले आहे.तिरोडा तालुक्यातील पालडोगरी ग्राम पंचायतीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून १० पैकी १ भाजपला तर ९ जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी समर्थित ग्राम विकास पॅनलची सरशी झाली आहे.सडकअर्जुनी तालुक्यातील रेगेपार पांढरी ग्राम पंचायतिल ९ पैकी ९ जागेवरील उमेदवार ग्राम विकास पॅनलचे निवडून आले आहेत. या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.
Maharashtra Grampanchayat Election; गोंदिया जिल्ह्यातील मतदारांचा महाविकास आघाडीकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 12:08 PM