अर्जुनी मोरगाव : कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनची नितांत गरज होती राज्यात शंभर ऑक्सीजन प्लांट असताना गरजेच्या काळात राज्य सरकार एक प्लांट सुरू करू शकले नाही. दुर्दैवाने लाखो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. आघाडीत ताळमेळ नसल्याने अजूनही धान खरेदी प्रक्रियेत गोंधळ आहे. ऑनलाइन केलेले धान घेणे बंधनकारक नाही अशी जीवघेणी अट शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आली. शेतकऱ्यांचा बोनस अजून प्रलंबित आहे. हे व्यापाऱ्यांचे सरकार आहे. निष्पाप लोकांचे बळी घेऊन राजकीय पोळी शेकणाऱ्या महाविकास आघाडीने महाराष्ट्राला भकास केल्याचा घणाघात माजी मंत्री आ. परिणय फुके यांनी केला.
स्थानिक भाजप कार्यालयात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स भेट देताना ते बोलत होते. यावेळी राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, तालुका अध्यक्ष अरविंद शिवणकर, नामदेव कापगते, उमाकांत ढेंगे, केवळराम पुसतोडे, डॉ. गजानन डोंगरवार, रघुनाथ लांजेवार, देवेंद्र टेंभरे, रचना गहाणे, जे.डी.जगणित उपस्थित होते. कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने दोन ऑक्सिजन कोन्संट्रेटर्स भेट दिले. फुके म्हणाले, भविष्यात येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटे करिता प्रत्येकाने सज्ज राहावे. केंद्रातील भाजप सरकार सदैव जनतेच्या पाठीशी आहे. यावेळी माजी मंत्री बडोले यांनी महा विकास आघाडीवर टीका करीत जनता या सरकारचा अनुभव घेत आहे. शेतकरी, शेतमजूर ,कामगार ,बेरोजगार सारेच सरकारमुळे जेरिस आले आहेत. गरिबांना घरे देण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. मात्र वाळूवर निर्बंध घालून राज्य सरकार बेघर करण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद शिवणकर, संचालन लायकराम भेंडारकर यांनी केले. यशस्वितेकरिता विजया कापगते, मुकेश जायसवाल, विजय कापगते ,गिरीश बागडे, विनोद नाकाडे ,मंजुषा तरोणे, वर्षा घोरमोडे ,मीना शहारे, व्यंकट खोब्रागडे यांनी सहकार्य केले.
...........
बोडी सौंदर्यीकरणासाठी निधी द्या
नगरपंचायतचे माजी नगरसेवक देवेंद्र टेंभरे यांनी प्रभाग १० मधील बोडीच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. याकरिता दोन कोटी रुपये संभावित खर्च आहे. आ. परिणय फुके यांनी हा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी टेंभरे यांनी केली. फुके यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
===Photopath===
170621\img-20210617-wa0003.jpg
===Caption===
ऑक्सिजन काँस्ट्रेनटेटर भेट देतांना आ फुके