शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

महावितरणला १४ लाखांचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2017 2:05 AM

२९ मे रोजी आलेल्या वादळीवाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून मानवी जीवन विस्कळीत करतानाच पिकांचेही नुकसान केले आहे.

वादळीवाऱ्याने दिला झटका : पोल व वाहिन्या तुटल्या लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : २९ मे रोजी आलेल्या वादळीवाऱ्याने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून मानवी जीवन विस्कळीत करतानाच पिकांचेही नुकसान केले आहे. नुकसानीच्या या फटक्यातून महाराष्ट्र वीज वितरण कंपनीही सुटली नसून या वादळीवाऱ्यामुळे महावितरणला सुमारे १४.५३ लाखांचा फटका बसला आहे. यंदा उन्हाने चांगलेच चटके दिले व त्यावर अवकाळी पावसाने थोडाफार थंडावा दिला. मे महिन्यात २९ तारखेला वादळीवाऱ्याने चांगलाच कहर केला. या पाऊस व वादळीवाऱ्यामुळे कोठे झाडे पडली, तर कोठे घरांची पडझड झाली. तर पावसाने पिकांची नासाडी करून सोडली. अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याने वीज वितरण कंपनीलाही आपल्या पाशात घेतले आहे. २९ मे रोजीच्या वादळीवाऱ्यामुळे वीज कंपनीचे सुमारे १४.५३ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. वादळीवाऱ्यामुळे कोठे वीज पोल पडले तर कोठे वाहिन्या तुटल्या. विद्युतरोहित्रांतही बिघाड आला व अवघा जिल्हा अस्तव्यस्त झाला होता. या नुकसानीमुळे वीज वितरण कंपनीची चांगलीच पंचाईत झाली असून दुरूस्तीसाठी कसरत करावी लागली. विशेष म्हणजे हा तर उन्हाळ््यातील अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याचा कहर व त्यापासून झालेले नुकसान आहे. तर मान्सून सुरू झाल्यास वादळीवारा व पावसाने नेहमीच अशाप्रकारचे बिघाड येतात. त्यामुळे आता मान्सूनमध्ये ही महावितरणला यासाठी तयार रहावेच लागणार आहेच. त्यातही यंदा महावितरणला फक्त १४ लाखांचेच नुकसान सहन करावे लागले. तर मागील वर्षी वादळीवाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा कोटींच्या घरात गेल्याचीही माहिती आहे. १३.२ किमी वाहिनी तुटली पोल तुटले असतानाच जिल्ह्यात १३.२ किमी. वीज वाहिन्या तुटल्या आहेत. यात ६.५६ किमी. उच्चदाब व ६.४६ किमी. लघुदाब वाहिन्या आहेत. विभागनिहाय बघितल्यास, गोंदिया विभागात ५ किमी. उच्चदाब व १.३ किमी. लघुदाब तर देवरी विभागात १.५६ किमी. उच्चदाब व ५.१६ किमी. लघुदाब वाहिन्या तुटल्या आहेत. यातून एकूण सुमारे २.१२ लाखांचे नुकसान झाले आहे. ३ विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड वादळीवाऱ्याच्या कहरामुळे पोल व वाहिन्या तुटल्या असतानाच विद्युतरोहित्रही यापासून सुटले नाहीत. यामध्ये देवरी विभागात ३ रोहित्रांत बिघाड आला होता. अशाप्रकारे रोहित्रांमधील बिघाडामुळे कंपनीला २.८५ लाखांचे नुकसान झाले आहे. यावर वीज वितरण कंपनीकडून पोल व रोहीत्र बदलण्यात आले आहेत. ८३ खांब पडले वादळीवाऱ्यामुळे जिल्ह्यातील ८३ पोल पडले आहेत. यात १६ उच्चदाब व ६७ लघुदाब पोल आहेत. विभागनिहाय बघितल्यास, गोंदिया विभागात ७ उच्चदाब व १३ लघुदाब तर देवरी विभागात ९ उच्चदाब व ५४ लघुदाब पोल पडले आहेत. अशाप्रकारे पोल तुटल्याने महाविरणला सुमारे ९.५६ लाखांचे नुकसान झाले आहे.