शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

अहिंसा मॅराथॉन स्पर्धेत महेश व वैशाली प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 12:50 AM

जिल्ह्यातील तरूणांना खेळासंदर्भात जागृत करण्यासाठी पोलीस विभागातर्फे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आयोजित अहिंसा मॅराथॉन स्पर्धेत ७ हजार ६२० स्पर्धक धावले. ४२.१९५ किमी या फूल मॅराथॉनमध्ये गडचिरोलीचा महेश रामलू वाढई याने २ तास ३४ मिनिटात मॅराथॉन पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकाविला.

ठळक मुद्दे७६२० स्पर्धक धावले : ४ तास ३८ मिनिटात मॅराथॉन पूर्ण करणाऱ्यांना मुंबईत संधी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील तरूणांना खेळासंदर्भात जागृत करण्यासाठी पोलीस विभागातर्फे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आयोजित अहिंसा मॅराथॉन स्पर्धेत ७ हजार ६२० स्पर्धक धावले. ४२.१९५ किमी या फूल मॅराथॉनमध्ये गडचिरोलीचा महेश रामलू वाढई याने २ तास ३४ मिनिटात मॅराथॉन पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकाविला. तर मुलींच्या गटात वैशाली सुनील मते हिने ४ तास ३५ मिनीट १५ सेकंदात पूर्ण मॅराथॉन करून प्रथम क्रमांक पटकाविले.या स्पर्धेत ७६२० स्पर्धक धावले यात २ हजार १५० महिलांचा सहभाग होता. कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरून आमगाव किडंगीपार रेल्वे क्रासिंगपर्यंत ही स्पर्धा घेण्यात आली. ४२.१९५ किमी मॅरेथॉन स्पर्धा सकाळी ५.३० वाजता सुरू झाली.अर्ध मॅराथॉनमध्ये २१.१९७ किमी सकाळी ६ वाजता सुरू झाली. ६ किमी मॅराथॉन स्पर्धा सकाळी ८ वाजता सुरू झाली. या दरम्यान आवश्यक सेवा वगळता इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजित मॅराथॉन स्पर्धेत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही हे विशेष पोलिस विभागाच्या अत्यंत उत्कृष्ट नियोजनामुळे ही मॅरेथान स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.या स्पर्धेत महिला व पुरूषांना वेगवेगळे पुरस्कार देण्यात आले. या मॅराथॉन स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणून धावक मुन्नालाल यादव हे गांधीजींच्या वेषात धावले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. परिणय फुके, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली क्षेत्र अंकुश शिंदे, जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, आंतरराष्ट्रीय मॅराथॉन धावपटू मोनिका आथरे, जि.प.चे मुकाअ डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक हरिष बैजल, नगराध्यक्ष अशोक इंगळे, धावक मुन्नालाल यादव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप आवळे, गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते व इतर अधिकारी उपस्थित होते. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या छायाचित्राचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.पूर्ण मॅराथॉन ४ तास ३८ मिनिटात पूर्ण करणाºयांना मुंबई येथे होणाºया राष्ट्रीय मॅराथॉनमध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे.कार्यक्रमाचे संचालन शिक्षीका मंजूश्री देशपांडे तर आभार गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी मानले.६ किमी. मॅराथॉन स्पर्धेतील महिला विजेताप्रथम-वैशाली रहांगडाले (२० मिनिटे ५२ सेकंद), द्वितीय- सुषमा रहांगडाले (२६ मिनिटे ५५ सेकंद), तृतीय- पदमा पाचे (२७ मिनिटे ५१ सेकंद), चतुर्थ- तनूजा वाढवे (२८ मिनिटे २३ सेकंद), पाचवा- हसिता वाळवे (२९ मिनिटे ०५ सेकंद), सहावा- आशा शहारे (२९ मिनिटे ३९ सेकंद), सातवा- गायत्री मौजे (३० मिनिटे १२ सेकंद), आठवा- सत्यवती मच्छीरके (३० मिनिटे ४१ सेकंद), नऊवा- सत्यशीला दसरीया (३० मिनिटे ४४ सेकंद), दहावा- रियाली राऊत (३० मिनिटे ४६ सेकंद)४२.१९५ किमी मॅराथॉनमधील विजेतेप्रथम- महेश रामलू वाढई, द्वितीय- सुभाष दिनाजी लिल्हारे, तृतीय- दिनेश दाऊदसरे, चतुर्थ- राहूल हुकूमचंद मेश्राम, पाचवा- महेंद्र कचलाम, सहावा- सावंत साखरे, सातवा- आकाश बाबुलाल मोहुर्ले, आठवा- शेख उनयलींग मुरोर्य, नऊवा- अरूण धनलाल थिवकर, दहावा- मनोज मुरारी कचलाम.४२.१९५ किमी मॅराथॉन महिलांची बाजीवैशाली सुनील मते यांनी ४ तास ३५ मिनीट १५ सेंकदात मॅरेथान पूर्ण करून प्रथम आली. उषा सुखराम वलथरे ४ तास ३९ मिनिट ३० सेंकदात द्वितीय तर सविता मोहन लिल्हारे यांनी ४ तास ४४ मिनीटे ३९ सेकंदात मॅरेथान पूर्ण करून तृतीय क्रमांक पटकाविला.

६ किमी. मॅराथॉन स्पर्धेतील विजेतेप्रथम-सौरभ धनवंत बघेले (२० मिनिटे ९ सेकंद), द्वितीय- राजेश पुरूषोत्तम चौधरी (२० मिनिटे ५० सेकंद), तृतीय- विशाल धुरनलाल लिल्हारे (२१ मिनिटे १० सेकंद), चतुर्थ- विकास भोजराज बावणकर (२१ मिनिटे ४७ सेकंद), पाचवा- करण संतोष खरे (२१ मिनिटे ५० सेकंद), सहावा- राजेंद्र संदीप गोत्रे (२१ मिनिटे ५३ सेकंद), सातवा- महेंद्र मुरकुटे (२१ मिनिटे ५८ सेकंद), आठवा- संदीप पारधी (२२ मिनिटे ०४ सेकंद), नऊवा- अंकुश कोहराम (२२ मिनिटे १० सेकंद), दहावा- लोकचंद गहगये (२२ मिनिटे ११ सेकंद)