लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : येथील पंचायत समितीच्या सभापती पदावर महिला राखीव असल्याने पंचायत समितीवर पुन्हा महिलाराज येणार आहे. अनुसुचित जाती महिला प्रवर्गाकरिता राखीव सभापती पदाची माळ एकमेव सदस्य असलेल्या राष्टÑवादी काँग्रेसच्या वंदना बोरकर यांच्या गळ्यात पडणे निश्चित मानले जात आहे.पंचायत समिती सभापती पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ १५ जानेवारी २०१८ ला संपत आहे. या पदासाठी पुढील अडीच वर्षांचा कार्य काळाकरिता नुकतीच आरक्षण सोडत काढण्यात आली. यात सभापती पदासाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गाचे आरक्षण जाहिर झाले. त्यामुळे सभापतीपदी राष्टÑवादी काँग्रेसच्या वंदना बोरकर यांची वर्णी लागणार आहे.आमगाव पंचायत समितीच्या १९६० स्थापनेनंतर १९६२ ते २०१८ च्या सभापतींच्या कार्यकाळातील अठरावे सभापतीपद महिलांना मिळाले आहे. आमगाव पंचायत समितीत यापूर्वी चार महिला सभापतीपदी आरुढ झाल्या आहेत. पंचायत समिती सदस्यांचे पक्षीय बलाबल पूर्ण बुहमतात नसल्याने २०१५ ला राष्टÑीय काँग्रेस व भाजपने युती करुन सत्ता काबिज केली होती.पक्षीय सदस्यांमध्ये भाजप तीन, राष्टÑीय काँग्रेस चार तर राष्टÑवादी काँग्रेस पाच असे पक्षीय बलाबल आहे. यात दोन्ही पक्षांनी सहमतीने सभापतीपद काँग्रेसकडे तर उपसभापतीपद भाजपकडे असे समीकरण पुढे करुन सत्ता काबीज केली होती. पंंचायत समिती सदस्य संख्या बारा असून यात सहा महिला सदस्य आहे. यात राष्टÑवादी काँग्रेसच्या तीन महिला, काँग्रेसच्या दोन तर भाजपमध्ये एक महिला सदस्य आहेत. परंतु अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर होणाºया सभापती पदासाठी आरक्षणात अनुसूचित जाती महिला सोडत निघाली. यात प्रवर्गात एकमेव सदस्य असलेल्या राष्टÑवादी काँग्रेसच्या कट्टीपार पंचायत समिती क्षेत्रातील सदस्या वंदना बोरकर यांची निवड निश्चित आहे. राष्टÑवादी काँग्रेस बहुमत नसूनही आरक्षणातील सदस्य स्वत:कडे असल्याने सभापतीपद मिळवून पहिल्यांना सत्ता काबीज करणार आहे.उपसभापतीकरिता बलवान कोण ठरणार?अडीच वर्षापूर्वी युतीच्या सूत्रात काँग्रेस व भाजपने सत्ता मिळवित काँग्रेसकडे सभापती तर उपसभापती भाजपकडे होते. परंतु यावेळी तसे चित्र नाही. बहुमत नसूनही राष्टÑवादी काँग्रेसला सभापती पद मिळणार आहे. तर उपसभापतीकरिता युतीच सूत्र पुढे येणार आहे. यात बलवान कोण ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमगाव पंचायत समितीवर पुन्हा महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:39 AM
येथील पंचायत समितीच्या सभापती पदावर महिला राखीव असल्याने पंचायत समितीवर पुन्हा महिलाराज येणार आहे.
ठळक मुद्देराखीव जागेवर एकमेव महिला : राष्टÑवादी काँग़्रेसला संधी