लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवर आधारित आहे. त्यामुळे कृषीसाठी सिंचन आणि त्यावर आधारित उद्योग स्थापना करुन बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध होईल याच दृष्टीने आपले सदैव प्रयत्न राहिले आहे. क्षेत्राचा सर्वांगिन करणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.रेलटोली येथे आयोजित रोजगार मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जिल्हा पोलीस उपअधीक्षक रमेश बरकते,जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, माजी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, पी.जी.कटरे, विमल नागपूरे, रमेश अंबुले, लता दोनोडे, माधुरी हरिणखेडे, राधेलाल पटले, धनलाल ठाकरे, मलेश्याम येरोला, चमन बिसेन, अशोक अग्रवाल, दामोदर अग्रवाल, झामसिंग बघेले, विजय लोणारे, मिथून पटले, उषा शहारे, विठोबा लिल्हारे, विजय टेकाम, गिरीश पालीवाल, दीपक पवार, माधुरी कुंभरे, व्यकंट पाथरु, सहषराम कोरोटे, रत्नदीप दहीवले, पन्नालाल सहारे, राजेश नंदागवळी, अशोक लंजे, दीपक कदम, जगदीश मिश्रा, गोविंद अग्रवाल, नंदकिशोर अग्रवाल आदी उपस्थित होते. आ.गोपालदास अग्रवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोजगार मेळावा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आ.अग्रवाल म्हणाले गोंदिया विधान क्षेत्रात विविध विकास करुन या क्षेत्राचा कायापालट करण्याचा संकल्प आपण केला आहे. शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती आणि एका पाण्याने पीक गमाविण्याची वेळ येऊ नये यासाठी नवेगाव देवरी उपसा सिंचन योजनेसह इतरही योजनांची लवकरच मार्गी लावण्यात येतील. तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची गोंदिया स्थापना झाल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली आहे. त्यामुळे अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आ.अग्रवाल यांना शुभेच्छा देत त्यांचा विकास कामांचा गौरव केला.
क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच मुख्य ध्येय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 10:19 PM
जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवर आधारित आहे. त्यामुळे कृषीसाठी सिंचन आणि त्यावर आधारित उद्योग स्थापना करुन बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध होईल याच दृष्टीने आपले सदैव प्रयत्न राहिले आहे. क्षेत्राचा सर्वांगिन करणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : रोजगार मेळावा व विविध कार्यक्रम