यावेळी भावना उईके, तारा बनकर, अनिता लाडे, निरुपमा मंडल, गीता सय्याम, अतिया पठाण, शीला वासनिक, वीणा ओझा उपस्थित होत्या. सावित्रीबाई फुले, वीर बिरसा मुंडा यांच्या छायाचित्राचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. यावेळी महिलांना भेटवस्तुंचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविकातून अलका पेंदाम यांनी हळदी कुंकवाचे महत्व सांगून महिलांसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. भावना उईके, वीणा ओझा यांनी तिळगुळाचा गोडवा महिलांनी आपल्या जीवनात कायम ठेवून जीवन सुखकर करावे असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन गीता शिखरामे यांनी केले. तर आभार नाशिका मरस्कोल्हे यांनी मानले. बिरसा मुंडा समितीचे कार्यकर्ते सदाशिव पेंदाम, वासुदेव मडावी, धनराज पेंदाम, देवराम वलके, मुरलीधर पंधरे, तेजराम उईके, खुशाल सय्याम, रामचंद्र सय्याम, रवी काटेंगा, तुलाराम पुराम यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
केशोरी येथे मकरसंक्रांतीनिमित्त कार्यक्रम ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:26 AM