गोपालदास अग्रवाल : मोर्चा काढून एसडीओंना दिले मागण्यांचे निवेदन गोंदिया : अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्ते आलेल्या भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. उलट पूवी दिल्या जात असलेल्या अनेको योजनांचा लाभ बंद केला. या राज्य शासनाच्या या जनविरोधी धोरणा विरोधात जिल्हा कॉंग्रेस तिव्र आंदोलन करणार, असा इशारा महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिला. राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात जिल्हा कॉंग्र्रेस कमिटीने काढलेल्या मोर्चात ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. दरम्यान त्यांच्या नेतृत्वात उप विभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात, धानाची आधारभूत खरेदी प्रती हेक्टर २० क्विंटल वरून ५० क्विंटल प्रती हेक्टर करावी, जीवनदायी योजना त्वरीत सुरू करावी, प्रतिकुल वातावरणामुळे धान पिकावर विविध रोगराई लागली असून त्याचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना एकरी १५ हजार रूपये मदत द्यावी, पेट्रोल व डिजलवरील टॅक्सवृद्धी मागे घ्यावी यासह अन्य मागण्यांना समावेश आहे. निवेदन देताना, कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जिल्हा प्रभारी कृष्णकुमार पांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, माजी आमदार रामरतन राऊत, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. झामसिंग बघेले, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंग गुलाटी, राधेलाल पटले, लोकसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल, डॉ. नामदेव किरसान, पी.जी.कटरे, राजेश नंदागवळी, अमर वराडे, राधेश्याम बगडिया, सहेसराम कोरोटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नागपूरे, टोलसिंग पवार, पंचायत समिती सभापती स्नेहा गौतम, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, जिल्हा परिषद सदस्य सीमा मडावी, उषा सहारे, विठोबा लिल्हारे, विजय लोणारे, शेखर पटलेसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
राज्य शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार
By admin | Published: October 11, 2015 12:58 AM