ऑनलाईन लोकमतपरसवाडा : शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य उज्ज्वल व यशस्वी करण्यासाठी अभ्यासरूपी तपस्या करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व कृषी उत्पन्नबाजार समिती संचालक चतुर्भूज बिसेन यांनी केले.जवळील ग्राम खैरलांजी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आयोजित पालक मेळावा व शिक्षण महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती विजयसिंह डिंकवार, राजेश रहांगडाले, भूमेश्वर रहांगडाले, सरपंच संगीता बुद्धे, उपसरपंच खुशाल कडव, तुकाराम गोंधुळे, हुपराज जमईवार, पोलीस पाटील राजु कडवे, भाऊलाल मोहने, शालु बुद्धे, भारती कडव, ग्रामसेवक नरेश लांजेवार, जाधोराव बुद्धे, मनोहर बुद्धे, राणी गोंदुळे, ललीता देव्हारे, अंजना कडव, विलास भगत, जयदेव कडव, सुरेखा कडव, सायत्रा नागपुरे, गीता मते, मंजुलता शिवणकर, सुनिता गोंडाणे, उषा कडव व गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना बिसेन यांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे नाहीत. फक्त त्यांनी मनावर घेणे गरजेचे आहे. तर ते स्वत:चा विकास करतील व शासनाने दिलेल्या संपूर्ण योजनांचा खरच फायदा होईल, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सामुहिक नृत्य, आदिवासी नृत्य, स्वागत नृत्य, सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक राजु गाढवे यांनी मांडले. संचालन कमल चव्हाण यांनी केले. आभार नरेश चौरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुरेश पारधी, चेतन ठाकरे, अभय भगत, उज्वल नागपुरे, भूमेश्वर भगत, रोहीत लिल्हारे, श्याम भगत, मोनाली कडव, गौरव भगत, मयूर बुद्धे, संदीप पगरवार, छोटू भगत यांनी सहकार्य केले.
जीवनात यशस्वीतेसाठी अभ्यासरूपी तपस्या करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 9:32 PM
शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य उज्ज्वल व यशस्वी करण्यासाठी अभ्यासरूपी तपस्या करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व कृषी उत्पन्नबाजार समिती संचालक चतुर्भूज बिसेन यांनी केले.
ठळक मुद्देचतुर्भूज बिसेन : खैरलांजी जि.प. शाळेतील पालक मेळावा व शिक्षण महोत्सव