आॅनलाईन लोकमतगोंदिया : ग्रामीण भागाच्या विकासासाठी १४ व्या वित्त आयोगातून अनेक योजना राबविल्या जात आहे. नाबार्ड तसेच इतर संस्थाच्या मदतीने या सर्व योजना एकत्रीतपणे गावात राबवून सर्वांगिन विकास साधता येतो. सरपंच व सदस्यांनी पुढाकार घेऊन शहरांसारखे गाव देखील स्मार्ट करावे असे आवाहन महाराष्ट्र पंचायत परिषदेचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी येथे केले.महाराष्टÑ पंचायत परिषद गोंदिया जिल्हा शाखेतर्फे जिल्ह्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकाºयांची कार्यशाळा स्थानिक यशोदा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. माजी. आमदार रामरतन राऊत, परिषदेचे सचिव सुधीर सुर्वे, सामाजिक कार्यकर्ता जे.डी. जगणीत, तुंडीलाल कटरे, तेजलाल चौरावार, भुमेश्वर डोहळे, कैलास भोयर, राजेश भोयर, मुकेश भोयर, प्रकाश कावळे, अरविंद रामटेके, इंद्रास झिलपे उपस्थित होते. जाधव म्हणाले, जोपर्यंत ग्रामपंचायतचे पदाधिकारी गावाच्या विकासासाठी पुढाकार घेत नाहीत.तोपर्यंत गावाच्या विकासाला चालना मिळणार नाही. शासनाच्या विविध योजना असून त्यांची माहिती बºयाच पदाधिकाºयांना नसते. त्यामुळे गावाचा विकास खुंटतो त्यासाठी योजनाची माहिती असणे गरजेचे असल्याचे सांगितले.सुर्वे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, प्रशासन व्यवस्था, संविधान व कायदे, सामान्य माणसाचे हक्क, अधिकार, कर्तव्य आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.उपस्थित अन्य मान्यवरांनी आदर्श गाव आणि स्मार्ट ग्राम, महाराष्टÑ पंचायत परिषदेची संकल्पना व्याप्ती व कार्य यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेला आठही तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी गणपत देशमुख, धनपत भोयर, कैलास घासले, श्यामप्रकाश देशमुख, दिनेश तरोणे, उदयकुमार काळे, हिरामन कावळे, सुधीर भांडारकर, सेवक वलथरे,महेश डोहळे, तोपालाल भोयर, श्यामराव झिंगरे यांनी सहकार्य केले.
शहरांप्रमाणे गाव स्मार्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:09 AM
ग्रामीण भागाच्या विकासासाठी १४ व्या वित्त आयोगातून अनेक योजना राबविल्या जात आहे.
ठळक मुद्देप्रल्हाद जाधव : महाराष्ट्र पंचायत परिषद कार्यशाळा