प्रफुल्ल पटेल : नमाद महाविद्यालयात रोसेयोच्या विद्यार्थ्यांची आदरांजली गोंदिया : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात व्यवसायाच्या निमित्ताने आलेले अल्पशिक्षित स्व. मनोहरभाई पटेल यांनी गोंदिया शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आदिवासीबहुल भागातील जनतेसाठी शिक्षणाची सोय करून दिली. संपूर्ण आयुष्य स्वत:साठी जगण्यापेक्षा दुसऱ्यांसाठी जगणारे स्व. मनोहरभाई पटेल हे ‘मन के मित’ असल्याचे प्रतिपादन राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी केले. स्व. मनोहरभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त ते स्वत:च्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित नमाद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य योगेश नासरे यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. बबन मेश्राम, सहायक कार्यक्रम अधिकारी रवी रहांगडाले यांच्या नेतृत्वात स्व. मनोहरभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातून शांतात रॅली काढली. त्यानंतर खा. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक व रासेयोच्या विद्यार्थ्यांनी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर पुष्प अर्पण करून आदरांजली दिली. खा. पटेल पुढे म्हणाले, स्व. मनोहरभाई पटेल यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी जात, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत असा भेद न करता सर्वसामान्यांसाठी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य केले. त्यांचे कार्य पुढे नेण्याचा वारसा मी चालवित आहे. नवीन पिढीला अशा उपक्रमातून स्व. मनोहरभाई पटेल यांच्या कार्याची जाणीव होते, ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. या वेळी बी.कॉम. अंतिम वर्षाची विद्यार्थिनी भोजवानीने स्व. पटेल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. संचालन प्रा. बबन मेश्राम यांनी केले. आभार प्रा. रवी रहांगडाले यांनी मानले. कार्यक्रमासाठी योगेश खोब्रागडे, खुशाल हरिणखेडे, वामन तुरकर, जागृत सेलोकर, नंदनी कटंगीकार, दिपाली डहाटे, प्रियंका किरणापुरे, भाग्यवंती नागज्योती, शिल्पा राऊत, सोनिया दीप, आकाशा नागपुरे, पायल गजभिये, रोहीत नामुर्ते, शुभम सूर्यवंशी, गौतमी सदोपाच, माधुरी मेश्राम, खुशबू चिखलोंडे, शुभम कोल्हटकर, अश्विनी कावळे, रमेश बहेटवार, सरिता खोब्रागडे, सोनल पराते, महिवेश मंसुरी, निशा बोहने आदी रासेयोच्या सेवकांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
दुसऱ्यांसाठी जगणारे व्यक्तिमत्व म्हणजे मनोहरभाई पटेल
By admin | Published: August 19, 2016 1:30 AM