मुख्य वनसंरक्षक भगत : निबंध स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ गोंदिया : मनोहरभाई पटेल यांनी दर्शविलेल्या मार्गांचे अनुकरण करून आम्ही सामाजीक कार्य करायला हवे. त्यांनी शिक्षण क्षेत्र व जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत यांनी केले. भारतीय नवयुवत छात्रोत्थान संस्थेच्यावतीने मनोहरभाई पटेल स्मृती दिनानिमित्त घेतलेल्या निबंध स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभात ते गुरूवारी (दि.१८) प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार हरिहरभाई पटेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून दूरसंचार विभागाचे मुख्य प्रबंधक अरवींद पाटील, एमआयडीसी अध्यक्ष हुकूमचंद अग्रवाल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, शहर अध्यक्ष शिव शर्मा, अनिल गौतम, जलील खान पठाण, संस्था सचिव अशोक सहारे उपस्थित होते. याप्रसंगी पाहु्ण्यांनी मनोहरभाई पटेल यांच्या व संस्थेच्या कार्याची प्रशंसा करीत आपली श्रद्धांजली अर्पित केली. कार्यक्रमाला उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, नागझिरा व्याघ्रप्रकल्प वनसरंक्षक आर.एस. गोवेकर, सामाजीक वनीकरण उपसंचालक बडगे, अश्वीन ठक्कर, यु.टी.बिसेन, एन.एच.शेंडे व अन्य उपस्थित होते. संचालन रवी मुंदडा यांनी केले. आभार महेश करियार यांनी मानले. कार्यक्रमासाठी अॅड. अनिता शर्मा, महेश शर्मा, अभिजीत सहारे, आशा ठाकूर, गुड्डू बिसेन, मनिष कापसे, शैलेश जायस्वाल आदिंनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी) विजेत्यांना केले सन्मानित कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या न मिनल बेलगे, द्वितीय सिया धनेंद्र ठाकूर, तेजस्वीनी बंदनवार, तृतीय सोहन अनिल मेंढे, विभा ठाकरे, रियासिंग राठोड, शितल पवनलाल टेंभरे तर रितीका डोहरे, किरण गुंडेवार, नेहा पेंढारकर, स्नेहा चौबे, निलेश चौरे, निधी सयाम यांनी प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेच्यावतीने सर्जन भगत यांचा शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
मनोहरभार्इंचे काम प्रेरणादायी
By admin | Published: August 20, 2016 12:55 AM