गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या रायपूर मंडळांतर्गत सिलायारी-मांडर उरकुरा दरम्यान तिसरी नवीन रेल्वे लाईन बनविली जात आहे. या सेक्शनमध्ये प्री-नॉन इंटरलॉकिंगचे कार्य करण्यासाठी २२ मे ते ६ जूनदरम्यान वेळोवेळी मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर मंडळातील अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे अंतर्गत रायपूर मंडळात तिसऱ्या लाईनच्या कामासाठी प्री-इंटर लॉकिंगचे कार्य २२ मे ते ६ जून दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे वेळोवेळी मेगा ब्लॉक होणार असल्यामुळे नागपूर मंडळातील अनेक रेल्वेगाड्या प्रभावित होण्यासहच रद्द करण्यात येतील. यात ट्रेन क्रमांक (१२८५५) बिलासपूर-नागपूर इंटरसिटी एक्सप्रेस २८ मे रोजी रद्द करण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक (१२९५६) नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेस २८ मे व ३० मे रोजी या दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. मर्यादित कालावधीसाठी काही रेल्वेगाड्यांच्या परिचालनातच्या परिवर्तनातही बदल करण्यात आले आहे. या गाड्यांमध्ये ट्रेन क्रमांक (५८११७) झारसुकडा-गोंदिया पॅसेंजरला २३ मे ते ३ जूनपर्यंत बिलासपूरपर्यंत व (५८११८) गोंदिया-झारसुकडा पॅसेंजरला रायपूर ते बिलासपूरच्या दरम्यान १२ दिवसांसाठी चालविण्यात येणार आहे. याशिवाय गाडी क्रमांक (१५२३१) बरौनी-गोंदिया, उस्लापूर-गोंदिया गाडीला २२ मे ते ३ जूनपर्यंत १३ दिवसांसाठी, गाडी क्रमांक (१२२३२) गोंदिया-बरौनी, गोंदिया-उस्लापूर गाडीला २३ मे ते ४ जूनपर्यंत १३ दिवसांसाठी, गाडी क्रमांक (५८१११) टाटा-इतवारी, बिलासपूर-इतवारी गाडी क्रमांक (५८११२) इतवारी-टाटा, इतवारी-बिलासपूरचे २२ मे ते ३ जूनपर्यंत रूट (मार्ग) परिवर्तीत करण्यात आले आहे. तसेच ट्रेन क्रमांक (१२८६०) हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस २५ व ३० मे रोजी दोन तास १५ मिनिटे तसेच २६ मे रोजी एक तास १५ मिनिटे बिलासपूरवरून नियंत्रित करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक (१२७६८) संत्रागाच्छी नांदेड एक्सप्रेस २६ मे रोजी ४५ मिनिटे व गाडी क्रमांक (२२५१२) कामख्या-कुर्ला एक्सप्रेस ३० मे रोजी एक तास ४५ मिनिटे बिलासपूरवरून नियंत्रण व गाडी क्रमांक (१८२४०) नागपूर-बिलासपूर एक्सप्रेसला २७ मे रोजी नागपूरवरून पाच तास विलंबाने सोडण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
मेगा ब्लॉकमुळे अनेक रेल्वेगाड्या होणार रद्द
By admin | Published: May 24, 2016 1:50 AM