याप्रसंगी इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा.डॉ.जे.जी.महाखोडे यांनी आपले विचार मांडताना मायबोलीचा गौरव करून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच कुठल्याही विषयाचे ज्ञान आपल्या मायबोलीत मिळाले तर त्यातील बारकावे समजण्यास मोलाची मदत होईल. त्यादृष्टीने मराठी माणसांनी मराठी भाषेचा मन:पूर्वक स्वीकार करावा असे मत मांडले. प्रा. डॉ. आनंद मोरे यांनी मायबोलीचे महत्त्व सांगून मायबोली ही प्रत्येकाला संस्कारक्षम बनविण्याचे उत्तम व प्रभावी साधन असल्याचे सांगितले. आपली संस्कृती व जीवनाला सुयोग्य आकार देणाऱ्या परंपरांचे जतन आणि संवर्धन मायबोलीतूनच होणे शक्य असते असे विचार व्यक्त केले. यानिमित्ताने महाविद्यालयातील पायल ठाकरे, शालिनी येळे, दीक्षा बिसेन, शाहिली चौधरी, बादल शरणागत इत्यादी विद्यार्थ्यांनीही मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक व संचालन प्रा.डॉ.एल.आर.राणे यांनी केले. आभार भाषाविभाग प्रमुख प्रा. डॉ. दिलीप जेना यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. किशोर हातझाडे,प्रा.डॉ.आनंद मोरे व प्राध्यापकांनी सहकार्य केले.
मराठी राजभाषा गौरव दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:32 AM