शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

बाजार समितीवर भाजपराज

By admin | Published: August 04, 2015 1:23 AM

जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता

काँग्रेसने दिली साथ : भाजपचे ९, राष्ट्रवादीचे ५ तर काँग्रेसचे ४ संचालकआमगाव : जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ९ जागा काबीज करून वर्चस्व सिद्ध केले. एक भाजप समर्थित संचालक निवडून आल्याने भाजपची संख्या १० झाली आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ५ संचालक निवडून आणण्यात यश आले. काँग्रेसला ४ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने आधीच हातमिळवणी केली होती हे विशेष.आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १९ संचालकांसाठी रविवारी निवडणूक झाली. ही निवडणूक तीनही प्रमुख पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली होती. राष्ट्रवादीला सत्तेवरून हटविण्यासाठी भाजप व काँग्रेसने संयुक्त आघाडी उभी केली. राष्ट्रवादी काँग्रेसनेही बाजार समितीवर पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी ताकद लावली होती. परंतु राष्ट्रवादीला केवळ पाच संचालक निवडून आणण्यात यश मिळाले.सदर निवडणुकीत सर्वाधिक मते संजय भेरसिंग नागपुरे यांना (४२०) तर दुसऱ्या क्रमांकावर माजी आमदार केशवराव मानकर यांना (३६५) मते पडली. या निवडणुकीत भाजप समर्थित अपक्ष उमेदवार गोकुल फाफट यांनी व्यापारी आडत्या मतदार संघात सर्वाधिक मते घेवून विजय संपादन केला.कृषी उत्पन्न बाजार समितीत यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता काबीज करुन वर्चस्व गाजविले होते. यातच अनेक भाजप पुढारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पक्षाचे मनोबल उंचावले होते. त्यामुळे बाजार समितीत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पक्षाला यश मिळविण्यासाठी नरेश माहेश्वरी व विजय शिवणकर यांनी शर्तीचे प्रयत्न केले, परंतु त्यांना अपेक्षित यश आले नाही.सदर निवडणुकीत भाजप व काँग्रेसने युती करून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. माजीआ. केशवराव मानकर यांचे एकहाती नियोजन यशस्वी ठरले. सोमवारी निवडणुकीची मतमोजणी विजयालक्ष्मी सभागृहात घेण्यात आली होती. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. (शहर प्रतिनिधी)असे आहेत नवनिर्वाचित संचालक४काँग्रेस-भारतीय जनता पक्ष युतीत सेवा सहकारी मतदार संघात माजी आमदार केशवराव मानकर, सुभाष आकरे, संजय नागपुरे, सतीश आकांत, बंसीधर अग्रवाल, रामनिरंजन मिश्रा, महिला गटात चिंतनबाई तुरकर, शांताबाई राखडे, इतर मागासवर्ग गटातून युवराज बिसेन, ग्रामपंचायत गटात रामेश्वर श्यामकुंवर, सर्वसाधारण गटात रविदत्त अग्रवाल, उमेंद्र रहांगडाले, व्यापारी आडत्या मतदार संघात भाजप समर्थित गोकुल फाफट, विपणन प्रक्रिया गटात विकास महारवाडे असे एकूण १४ संचालक निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे टिकाराम मेंढे, विनोद कन्नमवार, किशोर बोळणे, ब्रजेश असाटी आणि असे राजेश डोंगरवार असे एकूण पाच संचालक निवडून आलेत.